...तर हातात दंडुका घेऊ...शिर्डीतील वाहतूक पोलिसांना इशारा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाहतूक पोलिसांना इशारा
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patilsakal

शिर्डी : वाहतूक पोलिसांनी कुटुंबीयांसह दोन तास गाडी अडवून धरली. दहा हजार रुपये मागितले. तडजोड एक हजारात झाली. दोनशे रुपयांची पावती दिली आणि आठशे रुपये खिशात घातले, अशा शब्दांत एका साईभक्ताने मोबाईल फोनद्वारे आजच्या ग्रामसभेत तक्रार केली. ही कसली वाहतूक शाखा, ही तर भाविकांना दररोज लुटणारी शाखा, असा गंभीर आरोप करीत आजच्या ग्रामसभेत, शिर्डीतील पोलिसांची वाहतूक शाखाच रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, भाविकांची लुटमार थांबली नाही तर हातात दंडुके घेऊन बंदोबस्त करण्याचा इशारा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्याची वेळ आली.

Radhakrishna Vikhe Patil
Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt

यापूर्वी या प्रश्नावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी कमलाकर कोते व त्यांच्या सहकाऱ्यांसह मैदानात उतरून, भाविकांची अडवणूक करणाऱ्या वाहतूक शाखेचे पोलिस व अधिका-यांना जाब विचारला. काही काळ बंद झालेली अडवणूक पुन्हा सुरू झाली. ग्रामस्थांनी मोर्चे काढले, निवेदने दिली. फलनिष्पत्ती शून्य. विशेष म्हणजे, राज्यात कुठल्याही पक्षाचे सरकार असो; शिर्डीकडे येणा-या प्रत्येक महत्त्वाच्या रस्त्यावर साईभक्तांची वाहने अडविण्याचा कार्यक्रम सुरू असतो. आता पुन्हा सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले. ग्रामसभा घेऊन शिर्डीतली वाहतूक शाखा बंद करण्याचा ठराव घेतला. त्यापूर्वी, या पदाधिका-यांनी आधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना आणि त्यानंतर लगेचच आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना साकडे घातले.याबाबत जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी चर्चा करू, असे आश्वासन थोरात यांनी दिले आहे.

भाविक कमी, पोलिस अधिक

साईमंदिर खुले झाल्यापासून येथील वाहतूक शाखा एवढी जोमाने कामाला लागली आहे, की ब-याचदा रस्त्यावर भाविक कमी आणि वाहतूक पोलिस अधिक, असे चित्र दिसते. जाळ्यात मासे पकडावेत तशी भाविकांची चारचाकी वाहने आणि आजूबाजूच्या गावांतील शेतकरी आणि छोट्या व्यापा-यांच्या दुचाक्या अडवून, कुठले ना कुठले कारण दाखवून दंड आकारतात. ग्रामस्थांच्या वाहनांचे फोटो काढून ई-चलनाची उद्दिष्टपूर्ती करतात.लगेच दंडाची आकारणी विशिष्ट पद्धतीने बॅरिकेड लावून, त्यात वाहन शिरले, की लगेच दंडाची आकारणी करतात.

Radhakrishna Vikhe Patil
नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश

हा उच्छाद एवढा वाढला आहे, की नव्याने आलेले पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांना या पोलिस कर्मचा-यांकडची दंड पावती पुस्तके आणि ई-चलनचे मशिन काढून स्वतःकडे घ्यावे लागले.आजच्या ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते दीपक वारुळे यांनी एका भाविकाला फोन लावून ही लुटमारीची हकिगत सर्वांना ऐकवली. डॉ. एकनाथ गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते, अशोक कोते, नीलेश कोते, ॲड. अनिल शेजवळ, प्रमोद गोंदकर, सुजित गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय जगताप आदी पदाधिकारी व ग्रामस्थ या सभेस उपस्थित होते.

भाविकांकडे दहा हजार रुपयांची मागणी करण्याच्या प्रकाराची आपण चौकशी करू. त्यात दोषी आढळलेल्यांवर कारवाई करू. यापुढे भाविकांची कुठलीही तक्रार येऊ देणार नाही.

- हिरालाल पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com