लॉकडाऊनचा गैरफायदा घेणाऱ्या तोतया पोलिसांचा सुळसुळाट; नजर ठेवून केली फसवणूक

Taking advantage of the lockdown the Totaya police have kept an eye on the fraud
Taking advantage of the lockdown the Totaya police have kept an eye on the fraud

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : लॉकडाऊन आहे कुठे फिरता ओ बाबा, आणि हातात अंगठी घालून कशाला फिरता. त्याच वेळी त्यांचा अन्य दुसरा साथीदार तेथे आला व त्यालाही पोलिसी खाक्यामध्ये दम देत कुठे फिरतो रे' असे म्हणाले. यावेळी त्यांनी त्यालाही म्हटले लॉकडाऊन मध्ये सोनं घालून कशाला फिरतो. इकडे दे आम्ही तुला ते कागदाच्या पुडीत बांधून देतो. त्याने त्याची अंगठी दिल्यावर रामभाऊ पठारे यांनीही दिली. तोतया पोलिसांनी दोघांनाही कागदाच्या पुडीत बांधून दिली. 

मात्र थोडे पुढे गेल्यावर पठारे यांनी ती पुडी उघडून पाहिली असता आपली तोतया पोलिसांकडून फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर लगेच पठारे यांनी पारनेर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन फसवणूक झाल्याबाबतची तक्रार नोंदवली. शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना राळेगणसिद्धीत घडली. पठारे हे दुपारी आपल्या बँकेच्या कामासाठी गावात आले होते. बँकेतील काम संपवून ते परत घरी जात असताना तोतया पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवून त्यांची फसवणूक केली.

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने मागील दोन राळेगणसिद्धीत कडक लॉकडाऊन सुरू आहे. याचाच फायदा तोतया पोलिसांनी घेतला. सदर घटनेचा पुढील तपास पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, भालचंद्र दिवटे, अशोक रोकडे, सत्यम शिंदे, गहिनीनाथ यादव आदी करत आहेत.

पोलिस अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयातील कर्मचारी अशा प्रकारच्या कोणत्याही वस्तू कधीही मागत नाही. अशा प्रकारच्या वस्तू कुणी मागत असेल तर लगेच त्यांचे ओळखपत्र मागावे. ओळखपत्र दाखविल्यानंतरही शंका वाटत असेल तर लगेच आपल्या जवळच्या स्थानिक पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. 
- घनश्याम बळप, पोलिस निरिक्षक, पारनेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com