काय म्हणावं या पोरांना? आईने हातून मोबाईल घेतल्याने मुलगा गेला रूसून

मनोज जोशी
Sunday, 18 October 2020

या बाबत त्याचे वडील विनोद मैले यांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात कारणासाठी कुणीतरी मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 

कोपरगाव : मोबाईल व्यसनाच्या अनेक रोज वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळतात. कोपरगावातही अशीच एक घटना घडली आहे. या घटनेमुळे पूर्ण परिवाराच काळजीत आहे.

मोबाईलवर गेम खेळण्याऐवजी अभ्यास कर, असे सांगून आईने मोबाईल काढून घेतल्याने मुलगा घरातून निघून गेला आहे. तो अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकतो. अविष्कार विनोद मैले (वय 17) असे त्याचे नाव आहे.

मात्र, या बाबत त्याचे वडील विनोद मैले यांनी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात कारणासाठी कुणीतरी मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील बाजारतळ परिसरात विनोद मैले यांचे कुटुंब राहते. मुलगा सातत्याने मोबाईलवर गेम खेळत असल्याने अविष्कारच्या हातातून त्याच्या आईने तो काढून घेतला. तसेच अभ्यास करण्यास सांगितले. त्या रागातून 17 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 12 वाजता घरात कोणालाही काहीही न सांगता, तो निघून गेला. व्यवसायाने पेंटर असलेले विनोद मैले यांनी सर्वत्र शोध घेतल्यावर अखेर शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Taking the mobile, the boy left the house