कर्जतमध्ये इतक्या दिवस लॉकडाउन...कोणी घेतला हा निर्णय वाचा तर खरं

नीलेश दिवटे
Sunday, 16 August 2020

या सर्व बंद मध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून औषधांची दुकाने  मात्र सुरू राहतील.तसेच या बंद काळात पोलिसांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

कर्जत : शहरातील कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. खबरदारी म्हणून येत्या दहा दिवसांत कर्जत शहरात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. संसर्ग टाळण्यासाठी पूर्ण बंद पाळण्यात येणार  आहे. विशेष म्हणजे हा निर्णय तालुका किंवा जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही.

शहरातील व्यावसाईक संघटनाशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याची माहिती  दीपक उर्फ पप्पुशेठ शहाणे यांनी दिली आहे. यावेळी अर्जुन भोज, सचिन घुले, सोमनाथ कुलथे, महावीर बोरा, विक्रम गदादे, विशाल फरतडे आदी उपस्थित होते.

शहरात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण निघू लागले आहेत. त्यामुळे शहरात लॉकडाऊन होणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत कोणी निर्णय घ्यायचा असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात, शहरात फिरतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्यामुळे व्यावसायिकांनी स्वतःहून बंद करणे बाबत चर्चा झाली.

हेही वाचा - सावधान...कोरोनाची ही टेस्ट केली तर जिवानिशी जाल

तीत सर्वांनी एकमताने दहा दिवस (ता.१७ ते २७ अॉगस्ट) सर्व व्यवहार,दुकाने बंद ठेवीत कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र गैरसोय टाळण्यासाठी उद्या ता १७ ऑगस्ट रोजी किराणा व कृषी सेवाची दुकाने सकाळी ९ ते १ उघडे राहतील. मात्र इतर दुकाने बंदच राहतील. दि. १८ पासून मात्र किराणासह सर्व दुकाने कडकडीत बंदच राहतील असे यावेळी जाहीर करण्यात आले.

या सर्व बंद मध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून औषधांची दुकाने  मात्र सुरू राहतील.तसेच या बंद काळात पोलिसांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

कोरोना प्रार्दूभाव वाढतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता लॉकडाउन करावे अशी मागमी करीत आहे. भारतीय जनता पक्षही त्याच बाजूने आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष या विरोधात आहे. व्यावसाय बंद ठेवले तर लोकांची उपासमार होईल, असे मानणाराही एक गट आहे. परंतु जीव नाही राहिला तर व्यावसाय करून काय उपयोग असेही काहींना वाटते. मात्र, कर्जतमध्ये सर्व व्यावसायिकांनी एकमताने बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten days lockdown in Karjat