प्रश्‍न मांडताच शुद्ध पाण्याची व्यवस्था; कायमस्वरुपी पाणी योजनेसाठी मंत्री तनपुरे यांच्याकडून दहा लाखाचा निधी

Ten lakh fund from Minister Tanpure for permanent water scheme
Ten lakh fund from Minister Tanpure for permanent water scheme

अहमदनगर : पिण्यासाठी दूषित पाणी मिळत असल्याची तक्रार डोंगरगण (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी केल्यानंतर नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनी गावाला पिंपळगाव माळवी तलावातून स्वतंत्र पाइपलाइनसाठी दहा लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष पाणी मिळेपर्यंत, गावात शुद्ध पाण्यासाठी दोन ॲरोंची तातडीने व्यवस्था केली. 

डोंगरगण येथे मंत्री तनपुरे यांनी नुकताच जनता दरबार भरविला. त्यात त्यांनी गावातील दोन मुख्य रस्ते, शेतकऱ्यांना विजेसाठी नवी तीन वीजरोहित्रे, व्यायामशाळा, घरकुल, आरोग्य कर्मचाऱ्यांसह विविध विषय मार्गी लावले. जिल्हा परिषद सदस्य गोविंद मोकाटे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, मंडलाधिकारी वृषाली करोसिया, तलाठी वर्षा शिंदे, विस्ताराधिकारी ठकाराम तुपे, ग्रामसेवक सुरेश सौदागर, कृषी सहायक अभिजित डुक्रे, पोलिस पाटील आदिनाथ मते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जनता दरबारात दूषित पाणीपुरवठ्याविषयीच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले. गावातील शीवरस्ता, पाणंद रस्ता यांचे अतिक्रमण हटवून रस्ते खुले करून दिले. गुंजाळे रस्त्याचे काम सुरू करण्याची सूचना केली. ग्रामस्थांचे स्थानिक पातळीवरील वादही मिटविले. आरोग्य अधिकाऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावला. व्यायामशाळा व त्याच्या साहित्याची व्यवस्था केली. ग्रामस्थांनी अनेक अडचणींचा पाढा मंत्री तनपुरे यांच्यासमोर वाचला. त्यांनी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासकीय पातळीवरील सर्व अडचणींसंदर्भात संबंधितांना सूचना देऊन अनेक प्रश्‍न मार्गी लावले. 

मंत्री तनपुरे म्हणाले, ""ग्रामस्थांनी विकासकामांसाठी संघटित राहावे. गावात एकोपा असेल, तर त्यांना विकासकामांपासून कोणीही रोखू शकत नाही. डोंगरगणला धार्मिक व पर्यटकीय महत्त्व असल्याने, येथे भाविक व पर्यटकही येतात. त्या अनुषंगाने पर्यटन आणि देवस्थान परिसरात विकासकामे करू. गावात वीज, पाणी, रस्ते, तसेच महत्त्वाच्या अन्य कामांसाठी ग्रामस्थांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.'' 
किशोर काळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पटारे यांनी आभार मानले. 

विरोधकांवर टीका नाही 
डोंगरगण येथे राज्यमंत्री तनपुरे यांनी कोणताही सत्कार, हारतुरे न स्वीकारता ग्रामस्थांना बरोबर घेत गावातील गुंजाळे रस्त्याची पाहणी केली. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी समजून घेतल्या. पाणंद रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावला. तीन वीजरोहित्रांसाठी परिसर निश्‍चित करून त्याबाबत सूचना दिल्या. पूर्ण वेळ विकासकामांविषयी चर्चा केली. विरोधकांच्या कोणत्याही कामावर टीका न करता, यापूर्वी झाले ते झाले; यापुढे सर्व जण मिळून विकासकामे करू, असे ते म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com