esakal | कर्जत शहरात पाऴला जातोय कडकडीत बंद

बोलून बातमी शोधा

 karjat

सध्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लसीचा तुटवडा तर आहेच त्या बरोबर ऑक्सिजन बेड तर सोडाच साधे बेड ही मिळणे मुश्कील झाले आहे

कर्जत शहरात पाऴला जातोय कडकडीत बंद
sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : बाहेरून बंद आतून सुरु अशी लॉक डाऊनची स्थिती सध्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी जरी पोलिसांच्या मदतीने ब्रेक द चैन प्रभावीपणे जीव तोडून करीत असले तर मला काय त्याचे, माझा व्यवसायच बरा. अशा मानसिकतेत असलेल्या काही जणांमुळे मोठा धोका संभवत आहे. त्यांच्यावर वेळीच कारवाई न झाल्यास केलेल्या व करण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.

सध्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लसीचा तुटवडा तर आहेच त्या बरोबर ऑक्सिजन बेड तर सोडाच साधे बेड ही मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बेड अभावी तालुक्यात काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींना आळा बसणे गरजेचे आहे.

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात बांधकामांना बंदी असताना सुद्धा सर्रास बांधकामे सुरू आहेत. तसेच त्याला लागणारे सर्व साहित्य, किराणा दुकान, स्टेशनरी, मशिनरी आणि वेल्डिंग, इलेक्ट्रिक, ढाबा आदी वरतून बंद आणि आतून सुरू आहेत.

हेही वाचा: कर्जतमधील दुकाने फोडून सामान लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले

यासाठी गनिमी काव्याचा उपयोग केला जात असून दुकानाच्या शटरवर फोन नंबर दिले आहेत ते लावल्यानंतर काय पाहिजे? या हळूच शटर उघडून किंवा पाठी मागच्या बाजूने या असे म्हणीत त्याला हवे ते देण्यात येते. नाही तर पर्यायी मार्ग सांगितला जातो. यामुळे साखळी ब्रेक होण्याऐवजी अजून स्ट्रॉंग होत असल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात रुग्णाची संख्या इथून पुढे वाढणार आहे.

कर्जत तालुका नगर जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. त्यामुळे शेजारील बीड, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील सरहद्दीवरील गावातील लोक अंतराने जवळ म्हणून कर्जत तालुक्यातील लागत च्या गावांना पसंती देत आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त असल्याने प्रशासनाला मर्यादा येत आहे. नेमका याचाच गैरफायदा उठविला जात आहे.

या बाबत पथक तयार करण्यात आले असून ते अचानक भेट देऊन वेळेचे निर्बंध सोडून व्यवसाय वा दुकान सुरू असेन. तेथे कोव्हिडं 19 अंतर्गत धडक कारवाई करीत दुकान सील करून फौजदारी संहिता गुन्हा दाखल करण्यात येईल. असा प्रकार आढळल्यास तहसीलदार कार्यालय, संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक अथवा मंडल अधिकारी यांना अवगत करावे अथवा थेट संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

- नानासाहेब आगळे, तहसीलदार, कर्जत