शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला | Ahmednagar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारनेर : शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला

पारनेर : शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला

पारनेर : तालुक्यात मागील आठ दिवसांपासून असलेले ढगाळ हवामान व पडणाऱ्या धुक्यामुळे तालुक्यातील कांदा, ज्वारी, वाटाणा, तसेच इतरही भाजीपालावर्गीय पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्यावर करपा पडला असून, उत्पादनात मोठी घट होणार आहे.

तालुक्यात मागील आठ दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे पिकांवर दुष्परिणाम झाला आहे. पिकांवर करप्यासह इतर रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. औषधांची फवारणी करताना शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.

हेही वाचा: अहमदनगर : एक्सलन्स इन्स्टिट्यूट उभारू - उदय सामंत

सध्या विहिरी, तलावांत पाणी असूनही वेळेवर वीज मिळत नसल्याने पिकांना पाणी देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके जळू लागली आहेत. अशातच आता ढगाळ हवामानामुळे पिकांवर पडलेल्या रोगराईमुळे मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदापिकाची लागवड झाली आहे. त्यावर रोग पडल्याने सध्या शेतकरी कांदापिकास पाणी देताना दिसत आहेत किंवा औषधे फवारताना दिसत आहेत.

loading image
go to top