अपुऱ्या ओलीवरच पिकांचा पेरा! भीमा पट्ट्यात खरीप धोक्यात

अपुऱ्या ओलीवरच पिकांचा पेरा! भीमा पट्ट्यात खरीप धोक्यात

Summary

मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरवातीला झालेला पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे खरिपाचा पेरा थांबला आहे.

सिद्धटेक (अहमदनगर) : भीमा पट्ट्यात पुरेशा पावसाअभावी खरीप हंगाम (kharif season) धोक्यात आला आहे. काही ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत, तर काही ठिकाणी दुबार पेरणीची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले असले, तरी मृग नक्षत्रावरच पेरणीच्या संधीचा अट्टहास शेतकऱ्यांकडून केला जात आहे. (the kharif season is in jeopardy due to insufficient rainfall in the bhima belt)

अपुऱ्या ओलीवरच पिकांचा पेरा! भीमा पट्ट्यात खरीप धोक्यात
सिद्धटेक : धार्मिक पर्यटन पुन्हा कोलमडले

भीमा पट्ट्यालगतच्या पश्‍चिमेकडील भागात रब्बी, तर तालुक्याच्या उर्वरित भागात खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. उजनी प्रकल्पामुळे बागायत क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. देशी बाजरी, संकरित बाजरी, तूर, मटकी, उडीद, तसेच बहुतांश ठिकाणी कापूस, भुईमूग ही खरिपातील पिके घेण्यात येतात. बेताचेच आर्थिक नियोजन केल्याने, पुरेसा पाऊस न झाल्यास पर्यायी सिंचन व्यवस्थाही अनेक शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे. मात्र, मे महिन्याच्या अखेरीस व जूनच्या सुरवातीला झालेला पाऊस पुरेसा नाही. त्यामुळे खरिपाचा पेरा थांबला आहे.

अपुऱ्या ओलीवरच पिकांचा पेरा! भीमा पट्ट्यात खरीप धोक्यात
सिद्धटेक: उजनी फुगवट्यात 'हेलिकॉप्टर'ची घुसखोरी..!

सद्यःस्थितीत मॉन्सून दाखल झाला असला, तरी पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाऱ्याबरोबर ढगदेखील पळू लागले आहेत. त्यामुळे पावसाची खात्री नाही. परिणामी, पेरणी आणखी लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. रोहिणी, तसेच मृग नक्षत्रावर पेरणी केल्यास चांगले उत्पन्न मिळत असल्याचा शेतकऱ्यांचा होरा आहे. पाऊस आणखी लांबल्यास बागायती क्षेत्रात खरिपाचा पेरा होईल; मात्र जिरायत क्षेत्र खरिपापासून वंचित राहण्याची भीती आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे, तसेच खतांचे नियोजन केले आहे; मात्र वेळेत पेरा न झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन तोटा सहन करावा लागणार आहे‌.

अपुऱ्या ओलीवरच पिकांचा पेरा! भीमा पट्ट्यात खरीप धोक्यात
सिद्धटेक: 'संकष्टी'ला 'कोरोना'चे संकट; भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद

मागील काही दिवसांमध्ये तालुक्याच्या अनेक भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला असला, तरी तो पेरणीसाठी पुरेसा नाही. त्यामुळे पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, अन्यथा पेरणी वाया जाण्याची शक्यता आहे.

- दीपक सुपेकर, तालुका कृषी अधिकारी, कर्जत

(the kharif season is in jeopardy due to insufficient rainfall in the bhima belt)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com