esakal | दातीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

The main accused in the Datir case has been arrested

पत्रकार दातीर हत्याप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राहुरी ः शहरातील पत्रकार रोहिदास दातीर यांचे भर दुपारी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) याला पोलिसांनी आज (रविवारी) अटक केली.

मंगळवारी (ता.6) रोजी दुपारी सव्वाबारा वाजता पत्रकार दातीर यांचे अपहरण करून त्यांचा मृतदेह दुपारी सव्वादोन वाजता राहुरी महाविद्यालय रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी कान्हू मोरे व अक्षय कुलथे हे दोघे घटनेच्या दिवसापासून पसार होते. या प्रकरणातील एक आरोपी कुलथे अद्याप पसार आहे.

पत्रकारांशी बोलताना पोलिस उपअधीक्षक मिटके म्हणाले, मागील 12 दिवसांपासून आरोपी मोरे याने सोलापूर, उदयपूर, केरळ, असा टॅक्‍सीने प्रवास केला. त्याच्याकडे सुमारे सव्वालाख रुपये होते. पैसे संपत आल्याने पैसे घेण्यासाठी तो नेवासे तालुक्‍यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. तो नगर-औरंगाबाद रस्त्यावरील गुरुदत्त हॉटेल परिसरात त्याला त्याब्यात घेवून राहुरी पोलिस ठाण्यात रात्री साडेअकरा वाजता अटक करण्यात आली.

बातमीदार - विलास कुलकर्णी