चोरी होत नसलेल्या शनि शिंगणापुरात चोरी, तीही विश्वस्तांकडूनच

Theft for darshan in Shanishinganapur
Theft for darshan in Shanishinganapur

सोनई : कोरोना संसर्गाच्या कारणावरुन शनिशिंगणापुर येथील स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन बंद असले तरी अनेक दिवसांपासून काही विश्वस्त व कर्मचारी आपआपल्या मर्जीतील भाविकांना बरोबर घेवून दर्शन घडवून आणत आहेत. चोरी होत नसलेल्या गावात दर्शन मात्र चोरुन होत असल्याचे दिसत आहे.

कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात विश्वस्त मंडळाने १७ मार्च २०२० रोजी दर्शनासाठी मंदीर बंदचा निर्णय घेतला होता.सुरुवातीचे काही महिने सर्वच हा नियम पाळत होते.मात्र काही दिवसांपासून काही विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांना घेवून त्यांचे खास दर्शन करुन घेत आहेत.ही पध्दत पाहून काही कर्मचारी आरतीचे लाइव्ह शनिदर्शन काही भाविकांना मोबाईलच्या व्हिडिओ काॅल द्वारे घडवू लागले.या सर्व प्रकाराने ग्रामस्थ व परीसरात नाराजी व्यक्त होत आहे.

देवस्थान प्रशासनाने मुख्य दरवाजा जवळ एक स्क्रीन लावून भाविकांसाठी बाहेरूनच दर्शन सुरु केले आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांनी कौतुक केले . राज्यातील तसेच बाहेरील अनेक भाविक तेथे दर्शन घेत आहे . परंतु दोन ते तीन अतिउत्साही विश्वस्त आप आपल्या मर्जीतील भाविकांना सोबत घेऊन मंदिरात जात आहे.काही दिवसांपूर्वी तर एका विश्वस्तांने जिल्ह्यातील दोन युवा नेत्यांचे 'खास' दर्शन घडवून आणले होते.

देवस्थानचे विश्वस्त ,अधिकारी , कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त मंदिरात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही.असे विश्वस्त मंडळ बैठकीत ठरले असताना चोरुन-लपून होत असलेल्या दर्शनाची चर्चा होत आहे.कोरोना काळात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर देवस्थानने तालुक्यातील एक लाख गरजूंना किराणा साहित्य वाटप केले.

पुण्याच्या ससून रुग्णालयास व्हेंटीलेटर भेट दिले.येथील भक्तनिवास येथे सर्व सुविधांचे केवीड सेंटर सुरु आहे.या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असताना चोरुन दर्शनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

विश्वस्त मंडळ बैठकीनंतर सर्वच अधिकारी व कर्मचारी यांना शनिमुर्तीकडे प्रवेश पुर्ण बंद आहे. काही विश्वस्त भाविकांना घेवून दर्शनासाठी जातात. विश्वस्त असल्याने आमचा विभाग त्यांना अडवत नाही.
- गोरख दरंदले,सुरक्षाधिकारी शनैश्वर देवस्थान
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com