खंडोबा मंदिरातील चांदीच्या पादुका चोरीला... सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद

Theft at Khandoba temple at Pimpalgaon Rotha in Parner taluka
Theft at Khandoba temple at Pimpalgaon Rotha in Parner taluka

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील राज्य सरकारच्या 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आसलेले कोरठण खंडोबा देवस्थानमध्ये चोरीची घटना घडली आहे. मंदीरासमोरील असणाऱ्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी भेट दिली असुन पुढील तपास सुरू केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरठण खंडोबा देवस्थान गडावर सोमवती अमावास्या निमित्त सोमवारी (ता. २०) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात धार्मिक कार्यक्रम पार पडला. परीसरातच मुख्य मंदीरासमोर खंडोबा देवाची पितळी मुर्ती आहे. तेथे बाहेरील बाजूस भाविकांना दर्शन घेण्यासाठी चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. पहाटे या परीसरात मोठ्या प्रमाणावर धुके पडते. याचा फायदा घेत चोरट्यांनी पहाटे तीनच्या सुमारास या पादुका लोखंडी शस्त्राच्या सहाय्याने काढुन पोबारा केला आहे. याच ठिकाणी खालच्या बाजूस असणाऱ्या भक्तनिवासाच्या दरवाजांचा कडी- कोंयडा देखील तोडण्यात आला.

मात्र त्या ठिकाणी चोरण्यासाठी काही हाती लागले नाही. हा सर्व प्रकार मंदिरामधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हीडिओमध्ये दोन चोर तोंडाला कापड (बुरखा) बांधुन पादुका चोरताना दिसत आहेत. ही घटना समजल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन मंदीर परीसराची पहाणी केली. आज देवस्थान मार्फत पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड यांनी दिली.
संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com