गेल्या महिन्यात जिथे पाच लाखाची चोरी तिथेच पुन्हा दुकान फोडून पावणे तीन लाखांवर डल्ला

Theft of three lakh from a shop on Paithan Road in Shevgaon taluka
Theft of three lakh from a shop on Paithan Road in Shevgaon taluka

शेवगाव (अहमदनगर) : शहरातील पैठण रस्त्यावरील कृषी सेवा दुकानाचे पत्रे मागील बाजूने उचकुन तब्बल एक लाख 71 हजार रुपये किमतीच्या मालावर चोरटयांनी डल्ला मारला. लागोपाठ आठ दिवसात दुस-यांदा शहरातील एकमेकाशेजारील दोन दुकानातून धाडसी चोरी करुन चोरटयांनी पोलीसांना आवाहन दिले आहे. ही घटना बुधवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीसांनी अज्ञात चोरटयांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत त्रानेश्वर भाऊसाहेब मोरे राहणार खुंटेफळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुभम अँग्रो एजन्सी या स्वत:च्या मालकीच्या पैठण रस्त्यावरील दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे चोरटयांनी उचकटून दुकानातील केबल, अँटोमँटीक स्टार्टर, लँपटाँप, प्रिंटर, पँच असे एक लाख 71 हजार रुपये किमतीचे कृषी साहीत्य चोरून नेले. सकाळी दुकानात आल्यानंतर सामान अस्ताव्यस्त पडल्यामुळे ही बाब लक्षात आली. तर शेजारीलच समर्थ किराणा स्टोअर्स या दुकानातही चोरटयांनी पत्र उचकुन चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र आतील बाजूने लोखंडी जाळी बसवली असल्याने चोरटयांचा प्रयत्न फसला. ही दोन्ही दुकाने शहराच्या जवळच पैठण रस्त्यावर असून पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहेत. 

चोरी झालेल्या दुकानाशेजारील समर्थ किराणा स्टोअर्स या दुकानात 23 आँक्टोबरला चोरटयांनी मागील बाजूने पत्रे उचकुन सुमारे पाच लाख रुपयांचे किराणा सामान व ताडपत्र्या चोरुन नेल्या. एवढया मोठया रकमेची चोरी होवूनही पोलीसांनी संबंधीत दुकानदाराची फिर्याद नोंदवुन घेण्यास तब्बल आठ दिवसाचा विलंब लावला. याबाबतची ज्ञानेश्वर दत्तू शेळके यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयांविरुध्द ता.30 आँक्टोबर रोजी केवळ 87 हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या सणासुदीचे दिवस असून दिवाळी निमीत्त सर्वच दुकानदारांनी मोठया प्रमाणावर माल दुकानात भरुन ठेवलेला आहे. शहरात अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या दुकानात एकाच पध्दतीने चोरी करुन चोरटयांनी मोठे धाडस दाखवले आहे. मात्र पोलीसांकडून चो-या थांबवण्यासाठी उपाय योजना करण्याऐवजी पोलीस फिर्याद घेवून गेलेल्या दुकान मालकांनाच वेठीस धरत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com