जुन्याच जॉब कार्डवर नगर जिल्हा परिषदेत परिचरांचे काम सुरू!

दौलत झावरे
Tuesday, 10 November 2020

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील विविध विभागांमध्ये परिचरांची 738 पदे रिक्त आहेत. सध्या जिल्ह्यात 700 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना 2011 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जॉब कार्ड दिले होते. मात्र, आजही त्याच जॉब कार्डवर त्यांचे काम सुरू आहे. कार्यालयीन साफसफाई, फायलींची ने-आण, तसेच अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कामे करण्याचे त्यात नमूद केले आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेसह 14 पंचायत समित्यांमधील विविध विभागांतील परिचरांना 2011 मध्ये दिलेल्या जॉब कार्डवरच त्यांचे काम सुरू आहे. कामात कुठलाही बदल झालेला नाही. 

जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील विविध विभागांमध्ये परिचरांची 738 पदे रिक्त आहेत. सध्या जिल्ह्यात 700 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना 2011 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जॉब कार्ड दिले होते. मात्र, आजही त्याच जॉब कार्डवर त्यांचे काम सुरू आहे. कार्यालयीन साफसफाई, फायलींची ने-आण, तसेच अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार कामे करण्याचे त्यात नमूद केले आहे.
 
दरम्यान, रिक्त जागा भरणे आवश्‍यक आहे. कर्मचारी उपलब्ध राहत नसल्याने अनेकांच्या रजा मंजूर केल्या जात नाहीत. काही विभागांतील कर्मचारी रजेवर गेल्यास तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी दिले जात नाहीत. त्यामुळे तेथील कामे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना करावी लागतात.

याबाबत जिल्हा परिषद परिचर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काळापहाड म्हणाले, की जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील विविध विभागांतील परिचरांना 2011-12 मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या कार्यकाळात जॉब कार्ड दिले होते. त्यांचे त्यानुसारच कामकाज सुरू आहे. 

पदोन्नती मिळाल्यानंतर अडचणी येतात 

जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेने पदोन्नती दिली जाते. पदोन्नती मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगामी काळात मिळणाऱ्या कामाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अनेकजण कामे अवघड जातील म्हणून पदोन्नती टाळत असतात. 

संपादन - सुस्मिता वडतिले

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They are working on the job cards issued in 2011 to the attendants of various departments in 14 Panchayat Samitis including Ahmednagar Zilla Parishad