मुलीच्या गळ्याला धारधार चाकु लावुन चोरट्यांनी १५ तोळे लुटले

चोरीचा प्रकार कळाल्यानंतर बेलापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव
crime
crimesakal

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) ः तालुक्यातील बेलापूर परिसरात आज (शुक्रवारी) मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धारधार चाकुचा धाक दाखवुन दोन ठिकाणी जब्बरी चोरी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. बेलापूर येथील गोशाळा परिसरात उदय खंडागळे यांच्या बंगल्यात चोरट्यांनी उचका पाचक करुन सुमारे १५ तोळे सोन्यासह रोख रक्कम व भगीरथ चिंतामणी यांच्या घरातुन सुमारे २५ हजार रुपये चोरुन नेले.

चोरीचा प्रकार कळाल्यानंतर बेलापुर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले होते. बेलापुर-श्रीरामपुर रस्ता परिसरात उदय खंडागळे यांचा बंगला असून आज मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लहान मुलीच्या गळ्याला धारधार चाकु लावुन धमकी दिली. त्यानंतर घरात उचका पाचक करुन चोरट्यांनी चक्क लग्नाचा फोटोअल्बम देखील बघितला. त्यातील घरातील महीलांचे फोटो शोधुन फोटोत दिसणारे दागिणे लवकर काढण्याची मागणी केली. दमबाजी करुन तब्बल १५ तोळे सोने व रोख रक्कम घेवून चोरटे पसार झाले.

crime
राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पाऊस; हवामानाचा इशारा

त्यानंतर काही वेळाने परिसरातील भगीरथ चिंतामणी यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. तेथेही उचकापाचक करुन सुमारे २५ हजार रुपये लुटले. त्यावेळी चिंतामणी यांचा मुलगा सोमनाथ याने एका चोरट्यासोबत झटापट केली. त्यावेळी चोरट्याने सोमनाथ यांच्या पायावर लोखंडी राँड मारला. तर सोमनाथने देखील चोरट्याला चोप दिल्याने चोरट्यांनी तेथुन धुम ठोकली. सोमनाथ यांनी पोलीसांना चोरीच्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र चोरटे तोपर्यंत परिसरातुन पसार झाले होते.

दरम्यान आज (शुक्रवारी) सकाळी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाचे प्राचारण केले. तेव्हा श्वान पथकाने पहाणी करुन कुऱ्हे वस्ती रस्त्याच्या दिशेने माग दाखविला. तेथून चोरटे वाहनाद्वारे पसार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे यांनी देखील घटनास्थळी भेट देवुन चोरीच्या प्रकाराची माहिती घेतली. याप्रकरणी शहर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अज्ञात चोरट्यांचा सर्वबाजूने तपास सुरु केला आहे. तर धाडसी चोरीच्या घटना वाढल्यामुळे बेलापुर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com