esakal | गावठी पिस्तुलासह तीन तरुण जेरबंद 

बोलून बातमी शोधा

Three youths arrested with pistols}

भातकुडगाव फाटा येथे पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले.

गावठी पिस्तुलासह तीन तरुण जेरबंद 
sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव : भातकुडगाव फाटा (ता. शेवगाव) शिवारात गावठी पिस्तुलासह फिरणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दुचाकी, असा मुद्देमाल जप्त केला. 

कृष्णा बाबासाहेब गुंड (वय 23, रा. अरणगाव, ता. नगर), नवाज सय्यद (वय 23, रा. माळीवाडा, नगर) व विकास दिलीप खरपुडे (वय 23, रा. बुरुडगाव रस्ता, नगर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत कॉन्स्टेबल कैलास पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस पथकाने काल (गुरुवारी) सायंकाळी भातकुडगाव ते ढोरजळगाव रस्त्यावर सापळा रचला.

भातकुडगाव फाटा येथे पोलिसांना पाहताच आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दुचाकी, असा ऐवज जप्त केला. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (एक मार्च) पोलिस कोठडी दिली.