esakal | तोफखाना, कोतवाली पोलिसांचे दारूच्या भट्ट्यांवर छापे; गावठी व देशी दारूच्या बाटल्या जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

police raid on liquor kilns

तोफखाना, कोतवाली पोलिसांचे गावठी दारूच्या भट्ट्यांवर छापे

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

नगर : शहरातील तोफखाना व कोतवाली पोलिसांनी रविवारी (ता. ११) शहराच्या विविध भागांत गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर (Furnace liquor) छापे घातले. यामध्ये गावठी व देशी दारूच्या ८८ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी चार व कोतवाली पोलिसांनी दोन, अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Topkhana-Kotwali-police-raid-on-liquor-kilns-ahmednagar-marathi-news)

७० लिटर हातभट्टी दारू जप्त

तपोवन रस्त्यावरील दळवी मळा, तोफखाना परिसरातील सोळा तोटी कारंजा, पंचरंग गल्ली, नेप्ती नाक्याजवळ बारवेसमोरील काटवन आदी चार ठिकाणी पोलिसांनी छापे घालून सुमारे सात हजारांची ७० लिटर हातभट्टी दारू जप्त केली. याप्रकरणी आकाश ठोंबे (रा. वारुळाचा मारुती मंदिराजवळ, नालेगाव), महादू औशीकर (रा. विठ्ठलवाडी, औशीकर वाडा, दातरंगे मळा), लतीफ शेख (रा. कौलारू कॅम्प, सर्जेपुरा) व शिवाजी नायकोडी (रा. ढवण वस्ती, तपोवन रस्ता) या चौघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिसांनी साठे वस्ती- माळीवाडा परिसरात व कायनेटिक चौक परिसरात छापे घालून हातभट्टी व देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी हवालदार सुमीत गवळी यांच्या फिर्यादीवरून हेमंत शिवाजी सुरे (रा. मल्हार चौक, रेल्वे स्टेशनजवळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार भारत इंगळे यांच्या फिर्यादीवरून बाबासाहेब वैरागर (रा. साठे वसाहत, माळीवाडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: 8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप

मटका चालविणाऱ्यावर देखील कारवाई

ढवण वस्ती येथील बंद टपरीच्या आडोशाला छापा घालून तोफखाना पोलिसांनी मटका चालविणाऱ्या एकावर कारवाई केली. याप्रकरणी जितेश राजू धोत्रे (रा. गुंडू गोडाउनमागे, तपोवन रस्ता) याच्या विरोधात पोलिस नाईक प्रदीप बडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Topkhana-Kotwali-police-raid-on-liquor-kilns-ahmednagar-marathi-news)

हेही वाचा: डॉ. प्रीतम मुंडेंना डावलल्याने भाजप नेत्यांचा जाहीर निषेध

loading image