"भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले"

 rains destroyed the houses of three farmers
rains destroyed the houses of three farmers Sakal

देवदैठण (जि.अहमदनगर) : मुसळधार पावसाने त्यांचे घर पडले. संपूर्ण रात्र पावसात भिजत काढली. घरातील साहित्य वाहून गेले. मुलाच्या अंगावर छत कोसळले. सारा संसार अर्ध्या रात्री उघड्यावर आला. हे संकट येथील संतोष दामू बनकर, दादाभाऊ दामू बनकर, जयसिंग दामू बनकर या गरीब शेतकऱ्यांच्या वाट्याला आले.


श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण परिसरात रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे बाजरीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. येथील बनकर कुटुंबावर मात्र मोठे संकट कोसळले. पावसात दगड-मातीचे घर पडले. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने फार हानी झाली नाही. बनकर यांचा मोठा मुलगा प्रशांत याच्या अंगावर छत पडल्याने तो किरकोळ जखमी झाला. मात्र, शेजारील दोन्ही घरांना तडे गेले. पावसामुळे बनकर कुटुंबीयांना रात्र पावसात भिजत काढावी लागली. बनकर यांचे संसारोपयोगी काही साहित्य पाण्याबरोबर वाहून गेले. धान्य भिजले, विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले. याबाबत सरपंच जयश्री गुंजाळ, वसंत बनकर, अनिल बनकर यांनी तलाठ्यांना माहिती देऊन संबंधित घटनेचा पंचनामा केला. आर्थिक मदत मिळण्यासाठी अहवाल पाठविला.

 rains destroyed the houses of three farmers
अमेरिकेची नोकरी सोडून आला; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC मध्ये यश


बनकर कुटुंब अतिशय गरीब आहे. त्यांचा संसार सध्या उघड्यावर आहे. हे कुटुंब घरकुलास पात्र आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीतून या कुटुंबाला मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे.
- जयश्री गुंजाळ, सरपंच

संबंधित ग्रामपंचायतीने घरकुलासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवावा. लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी तो वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.
- जे. डी. शेलार, गटविकास अधिकारी, श्रीगोंदे.

 rains destroyed the houses of three farmers
शेतकऱ्यांनो, सोयाबीन विक्रीची घाई करू नका! व्यापाऱ्यांचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com