आधार कार्ड बरोबर ठेऊनच ‘या’ भागातून जावा; नगर जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त

शांताराम काळे
Saturday, 15 August 2020

राजूर पोलिसांनी भंडारदरा, राजूर, बारी घाट येथे कडक नाकाबंदी केली आहे. त्यामुळे उत्साही पर्यटक, तरुणाई हात हलवत माघारी गेल्याने भंडारदरा परिसरात शांतता पाहायला मिळत आहे.

अकोले (अहमदनगर) : राजूर पोलिसांनी भंडारदरा, राजूर, बारी घाट येथे कडक नाकाबंदी केली आहे. त्यामुळे उत्साही पर्यटक, तरुणाई हात हलवत माघारी गेल्याने भंडारदरा परिसरात शांतता पाहायला मिळत आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी पुणे, नगर, संगमनेर येथून येणारे लोक राजूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थे समोर रंधा गाव, बारी घाट येथे चार गेट टाकून रस्ता बंद केला आहे. तर काही जण पोलिसांना चकवा देण्यासाठी गाडीतून उतरुन पायी चालत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही जाऊ दिले जात नाही.

आधारकार्ड मोबाईल, नंबर याची तपासणी केल्यानंतर तो स्थानिक असेल तरच सोडले जात आहे. काही तरुणांना अरेरावीमुळे चोप ही देण्यात आल्याची माहिती आहे. कडक बंदोबस्त असल्याने तरुणाई परत माघारी फिरल्याचे चित्र आहे. तर काही जण प्रेसकार्ड, आर्मी बोर्ड लावून पोलिसांना बेबनाव करत होते. त्यांनाही घरी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists can enter Akole taluka only by showing Aadhar card