esakal | पानोलीत १५० वडाची झाडे; समृद्ध गाव म्हणून नावारुपास आणण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Tree planting on behalf of villagers in Parner taluka

ऐक्य सेवा सेंटर, कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व नाबार्ड यांच्या दत्तक योजनेत पानोली गावाचा समावेश करण्यात आला आहे.  येथे आठ महिन्यात या संस्थांच्या वतीने  गावात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. 

पानोलीत १५० वडाची झाडे; समृद्ध गाव म्हणून नावारुपास आणण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : ऐक्य सेवा सेंटर, कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व नाबार्ड यांच्या दत्तक योजनेत पानोली गावाचा समावेश करण्यात आला आहे.  येथे आठ महिन्यात या संस्थांच्या वतीने  गावात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. गावात दरवर्षी किमान साडेतीनशे झाडांची लागवड करून गावातील विविध विकास कामांसाठी किमान पाच लाख रूपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे पानोली गाव लोकसहभाग व श्रमदानातून आदर्श व समृद्ध गाव म्हणून नावारूपाला येणार आहे.

पानोली ग्रामस्थांच्या विशेष प्रयत्नातून दत्तक गावामध्ये समावेश झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दीर्घकाळ टिकणारी व ऊंच वाढणारी मोठी वटवृक्षांची वनविभागाच्या हद्दीत लागवड करण्यात आली आहे. दहा ते बारा फुट उंचीचे 150 वडाचे झाडे व खाजगी डोंगरावर दहा फुट उंचीच्या 200 चिंचेचे झाडांची लागवड करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच अर्चना अंकुश गायकवाड यांनी दिली.

यापूर्वी या संस्थांच्या वतीने गावातील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत आठ लाख रूपये खर्च करून अत्याधुनिक शौचालय उभारले आहे. वनविभागाच्या हद्दीमध्ये सहा हजार पाचशे घनमीटर खोल सलग समतल चर खोदले आहेत. त्याचबरोबर संस्थेच्या वतीने दोनशे शेतक-यांना परसबाग करून दिल्या असल्याचेही गायकवाड यांनी सांगीतले.

या उपक्रमासाठी ऐक्य सेवा सेंटरचे अध्यक्ष तुकाराम वाखारे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. हा उपक्रम यशस्वीतेसाठी गावातील युवक अंकुश गायकवाड व उमेश गायकवाड यांचे  सहकार्य  लाभले आहे. या विविध कामांसाठी  वन समिती चे अध्यक्ष हरिभाऊ गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष इंद्रभान गाडेकर, राजमाता पतसंस्थेचे डॉ. रामचंद्र थोरात, भानुदास शिंदे, रामदास शिंदे, भरत वाखारे,अशोक खामकर, राजेंद्र गायकवाड व गोरक्ष वारे यांनी मोठी मदत केली असल्याचेही सरपंच गायकवाड यांनी सांगीतले. 

संपादन : अशोक मुरुमकर