Accident News: संगमनेर-अकोले रस्त्यावर भीषण अपघात; ३ जिवलग मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: संगमनेर-अकोले रस्त्यावर भीषण अपघात; ३ जिवलग मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू

संगमनेरमधून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दुधाचा टँकर आणि दोन दुचाकीच्या विचित्र अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संगमनेर -अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर - अकोले रस्त्यावरील मंगळापूर शिवारात दुधाचा टँकर आणि दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी टँकर जप्त केला असून, चालकाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

या भीषण अपघातात ऋषीकेश हासे ( वय वर्षे 20 ), सुयोग हासे ( वय वर्षे 20 ), निलेश सिनारे ( वय वर्षे 26 ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, मंगळापूर परिसरात या टँकरने तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये चालकाचा बेशिस्तपणा, अतिवेग, मोबाईल, आणि हेल्मेट न वापरणे अशाही कारणांचा समावेश आहे.

टॅग्स :accidentaccident death