सोनईत कांदा गेला "बारा"च्या भावात

विनायक दरंदले
Monday, 19 October 2020

याबाबत आडतदार सुदाम तागड म्हणाले, की बहुतेक कांदागोण्यांना आज 4 ते 8 हजारांचा भाव मिळाला. तुरळक माल 10 ते 12 हजारांनी गेला. जास्त भावाची पट्टी व व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. शेतकऱ्यांनी लगेच सर्व कांदा आणू नये. भाव अजून वाढणार आहेत. अहमदनगर

सोनई : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात आज 29 हजार कांदागोण्यांची आवक झाली. एक नंबर गावरान कांद्याला 12 हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. अवघ्या चार तासांत उपबाजारात 12 कोटी रुपयांची उलाढाल झाली. 

घोडेगाव येथील उपबाजारात आज दुपारी 12 वाजता लिलाव सुरू झाले. मागील आठवड्यापासून भाव वाढत असल्याने, आता शेतकरी एकदम माल न आणता दर लिलावास 10-20 गोण्या विक्रीसाठी आणत आहेत.

शनिवारी (ता.17) एक नंबर कांद्याला आठ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता. आज काही मोजक्‍या गोण्यांना 10-12 हजारांचा भाव मिळाला. एक नंबर कांद्यास 10-12 हजार, दोन नंबर कांद्यास सहा ते साडेसात हजार, मध्यम कांद्यास पाच ते साडेसहा हजार, तर गोल्टी कांद्यास तीन ते पाच हजारांचा भाव मिळाला. 

याबाबत आडतदार सुदाम तागड म्हणाले, की बहुतेक कांदागोण्यांना आज 4 ते 8 हजारांचा भाव मिळाला. तुरळक माल 10 ते 12 हजारांनी गेला. जास्त भावाची पट्टी व व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. शेतकऱ्यांनी लगेच सर्व कांदा आणू नये. भाव अजून वाढणार आहेत. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve thousand rupees per quintal of golden onion