Tue, May 30, 2023

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं! आईसह दोन तरुण मुलींच्या आत्महत्येने खळबळ
Published on : 1 March 2023, 11:37 am
अहमदनगर : जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आईसह दोन मुलींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी समोर आली आहे. आत्महत्येमुळे नगर जिल्हा हादरला असून पोलिस या या घटनेचा तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मन्याळे गावात घडली. या घटनेती सुनिता अनिल जाधव (वय 48) यांनी गळफास घेत आत्महत्या केली.त्यानंतर प्राजक्ता जाधव (वय 22) आणि शितल जाधव (वय 18) या दोन्ही बहिणींनी देखील विहीरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं कारण काय?
या प्रकरणी पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आईने आत्महत्या केल्यानंतर मुलींनी देखील टोकाचे पाऊल उचलले . मात्र या तिघींच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या तिहेरी आत्महत्येचे घटनेने मन्याळे गावावर शोककळा पसरली आहे.