
Uddhav Thackeray : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे साई चरणी; शिंगणापूरमध्येही घेतलं दर्शन
सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे हे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज (१२ मे) शिर्डीतील साई मंदिरात साईंचे दर्शण घेतले. त्यांच्या सोबत त्यांच्या रश्मी ठाकरे यादेखील आहेत.
या दौऱ्यावर असताना त्यांनी आधी शनिशिंगणापूर येथे शनिदर्शन घेतले त्यानंतर इतर काही कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर त्यांनी शिर्डीतील साई मंदीराला भेट देत साईंचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सत्तासंघर्षाची सुनावणी झाल्यानंतर ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे.
उद्धव ठाकरे यांनी या दौऱ्याच्या सुरूवातीला सोनई येथील आमदार शंकरराव गडाख याच्या निवसस्थानी जाऊन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांना वाढदिवसात्या शुभेच्छा देखील दिल्या. त्यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी आज ८० व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांची निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या असं म्हटलं आहे.
यशवंतराव गडाख साहेबांनी उत्तम राजकारणी नेतृत्वाचा आणि कार्याचा ठसा कारकिर्दीत उमटवला. त्यांच्या याच कार्यातून आणि साहित्यातून आजच्या पिढीला नक्कीच योग्य दिशा मिळेल! असेही ठाकरे म्हणालेत.