urban bank gold lending
urban bank gold lendingesakal

अर्बन बँक बनावट सोनेतारण प्रकरण : पाच कोटींची फसवणूक

शेवगाव (जि.अहमदनगर) : राज्यात बहुचर्चित नगर अर्बन बँकेच्या (urban bank) शेवगाव शाखेतील बनावट सोने तारणप्रकरणी (Fake-Gold-Lending-Case) गोल्ड व्हॅल्युअरसह विशाल गणेश दहिवाळकर याच्यासह १५९ कर्जदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेवगाव शाखेचे व्यवस्थापक अनिल वासुमल आहुजा यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट सोने तारण ठेवून बँकेची सुमारे पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. (Urban-Bank-Fake-Gold-Lending-Case-marathi-news-jpd93)

गोल्ड व्हॅल्युअरसह १५९ कर्जदारांवर गुन्हा

आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर व कर्जदारांनी संगनमत करून बनावट दागिने खरे असल्याचे भासवून मूल्यांकन दाखले देऊन बँकेकडून कर्ज घेतले. कर्जदारांना वेळोवेळी नोटिसा देऊनही त्यांनी तारण ठेवलेले सोने सोडून घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नगर येथे बँकेच्या मुख्य शाखेत या सोन्याचा लिलाव ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील सोने बनावट असल्याचे समोर आले. मागील चार वर्षांच्या कालावधीत १५९ कर्जदारांनी ३६४ पिशव्यांत २७ किलो ३५१.१० ग्रॅम सोने बँकेकडे तारण ठेवून सुमारे पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यामुळे बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर दहिवाळकर याच्यासह १५९ कर्जदारांवर बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

urban bank gold lending
कोरोनावर 'हे' औषध ठरेल गेमचेंजर! डॉक्टर दाम्पत्याचा दावा

मध्यस्थी करणारे दलाल कोण?

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने सोनेतारण कर्जदारांमध्ये खळबळ उडाली आहे. सोनेतारण व्यवहारात गोल्ड व्हॅल्युअरने मध्यस्थामार्फत काही कर्जदारांना गाठून ‘माझ्या नावे अगोदरच बँकेचे सोनेतारण कर्ज आहे. मला तातडीची आर्थिक गरज असून, सोने मी देतो फक्त तुमच्या नावे बँकेत ठेवा,’ असे सांगून फसवणूक केल्याची व्यथा अनेकांनी व्यक्त केली. या फसवणुकीत गोल्ड व्हॅल्युअरबरोबर बँकेतील इतर कोण सहभागी होते का? त्याचे मध्यस्थी करणारे दलाल कोण? यांचा ही शोध घेण्याची गरज आहे.

...तर शिंदेंची आत्महत्या टळली असती

बनावट सोने तारण ठेवून कर्ज उचलले जात असल्याची तक्रार तत्कालीन व्यवस्थापक गोरक्षनाथ शिंदे यांनी २०१८ मध्ये बँक प्रशासनाकडे केली होती. मात्र बँक प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांच्यावर दबाव आल्याने मागील आठवडयात विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात दाखवलेली तत्परता बँक व्यवस्थापनाने अगोदरच दाखवली असती, तर शिंदे यांच्यावर आत्महत्येची वेळ आली नसती, अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.

urban bank gold lending
"मी पुन्हा येईन, ही डरकाळी आता ‘लांडगा आला रे लांडगा' सारखीच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com