Urban Cooperative Bank election : सर्व उमेदवार निवडून येतील : कटारिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urban Cooperative Bank election

Urban Cooperative Bank election : सर्व उमेदवार निवडून येतील : कटारिया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर : जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांतील सामाजिक कामांत अग्रेसर असणारे उमेदवार सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत. चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सहकार पॅनल बहुमताने निवडून येईल, असा विश्वास पॅनलप्रमुख अशोक कटारिया यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: केजरीवालांचा बनवाट व्हिडीओ केला शेअर; संबित पात्रांवर कारवाईचे हायकोर्टाचे आदेश

टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे नगर अर्बन बँकेच्या सहकार पॅनलचा प्रचाराचा नारळ वाढविला, त्यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, सरोज गांधी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, मनीष साठे, दिनेश कटारिया, अनिल कोठारी, ईश्वर बोरा, शैलेश मुनोत, दीप्ती गांधी, कमलेश गांधी, सचिन देसर्डा, सरपंच अरुणा खिलारी, उपसरपंच सुनील चव्हाण, दादाभाऊ सोनावळे उपस्थित होते.

हेही वाचा: मुंबईत गर्भपाताच्या प्रमाणात घसरण; तीन वर्षात ३४ टक्के घट

सर्वच उमेदवारांनी सहकार पॅनली भूमिका विशद केली. अर्बन बँकेला पूर्ववैभव आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे स्मरण करण्यात आले.

loading image
go to top