शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमसी प्रणाली वापरा

Use CMC system for teacher pay
Use CMC system for teacher pay

संगमनेर ः प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या वेतनासाठीही सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रोडक्‍ट) प्रणाली लागू करावी, अशी मागणी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे केली. 

शिक्षक संघ, सदिच्छा मंडळ व पदवीधर शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने नुकतीच क्षीरसागर व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.

वेतनातील विलंब टाळण्यासाठी "सीएमपी' प्रणालीचा उपयोग केल्यास हा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. तसेच 24 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे निवडश्रेणीचे प्रस्ताव मागविणे, प्रॉव्हीडंट फंडाच्या पावत्या व डीसीपीएसचे हिशेब आदी प्रश्नांवर चर्चा झाली. 

तालुक्‍यातून निवडश्रेणीचे प्रस्ताव मागवले जाणार असून, जिल्ह्यात कोरोनाच्या काळात शाळेची वेळ एकच ठेवण्यात येणार असल्याचे, तसेच विज्ञान पदवीधर वेतनश्रेणी देण्याबाबत विचार सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी शिंदे यांनी सांगितले.

माधव हासे, रहिमान शेख, राजेंद्र शिंदे, नारायण राऊत, रवींद्र पिंपळे, राजेंद्र कुदनर, कैलास वर्पे, दादा वाघ, बाबा आव्हाड, सतीश चाबुकस्वार, चंद्रकांत मोरे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com