शेतकरी झाले बिनधास्त ः साडेचौदा लाख जनावरांचे  लसीकरण ...

Vaccination of 14.5 lakh animals ...
Vaccination of 14.5 lakh animals ...

नगर ः जिल्ह्यातील साडेचौदा लाख जनावरांना लसीकरणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली. 

गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन समितीची लेखी प्रतिपादन सभा झाली. संध्या आठरे, सोनाली रोहमारे, शांता खैरे, दिनेश बर्डे, वंदना लोखंडे, रावसाहेब कांगुणे, सुनील दौंड, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे आदींनी सहभाग नोंदविला. 

सुरवातीला, पावसाळ्यापूर्वीच्या जनावरांच्या लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. त्यात घटसर्प आजाराचे एक लाख 27 हजार 30, फऱ्या- एक लाख 11 हजार 677, घटसर्प-फऱ्या : 3 लाख 4 हजार 254, आंत्रविषार- एक लाख 44 हजार 660, पीपीआर- 19 हजार 845, राणीखेत- तीन लाख 77 हजार 75, कोंबड्या ः देवी- तीन लाख 44 हजार 486 व इतर 19 हजार 700 जनावरांना लसीकरण करण्यात आले. 

सर्वसाधारण योजना, आदिवासी योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपाययोजना, अनुसूचित जाती उपाययोजना या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यास मंजुरी देण्यात आली. त्यासाठी एक ते 31 जुलैदरम्यान पंचायत समिती स्तरावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर एक ते सात ऑगस्टदरम्यान अर्जांची छाननी होईल.

10 ते 12 ऑगस्टदरम्यान लाभधारकांची यादी जिल्हास्तरावर सादर करण्यात येणार आहे. 13 ते 14 ऑगस्टदरम्यान सोडत पद्धतीने लाभधारकांची निवड करण्यात येणार असल्याचे सभापती गडाख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com