मी भाजपमध्ये खुष आहे : वैभव पिचड

शांताराम काळे
Sunday, 20 December 2020

आपण यापूर्वी सांगितले आहेच परंतु आजही सांगतो, आपण भाजपमध्ये खुष आहे.

अकोले (अहमदनगर) : आपण यापूर्वी सांगितले आहेच परंतु आजही सांगतो, आपण भाजपमध्ये खुष आहे. इतर पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही. एका मराठी न्युज वाहिनीवर भाजपमध्ये गेलेले पुन्हा राष्ट्रवादीत येणार त्यात माजी आमदार वैभव पिचड यांचाही नामोल्लेख झाला होता.

त्याबाबत आज पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याबाबत नकार देऊन ही केवळ अफवा असून आपण भाजप पक्षात खुष आहोत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे आपला असा कोणताही पक्ष बदलाचा विचार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांची देश व राज्य हितासाठी चाललेली धडपड विकासाचे व्हिजन यामुळे मी त्यांच्या नेतृत्वावर खुष आहे. गाव तिथे भाजप शाखा, बूथ ही कामे माझे तरुण कार्यकर्ते करत आहेत. तर नुकताच गोवारी प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष्य घालून आदिवासी समाजाला न्याय हकक मिळवून दिला आहे.

कोरोना संकटात मोफत धान्य, शेतकऱ्याच्या खात्यावर निधी, महिलांना मोफत गॅस या योजना केंद्र सरकार व भाजप सरकारने दिल्या आहेत. गरिबांना अडचणीच्या काळात मदत करणारा भाजप हा एकमेव पक्ष असल्याचे माजी आमदार वैभव पिचड म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaibhav Pichad said I am happy in BJP