esakal | वंचित बहुजन आघाडी कर्जत नगरपंचायत स्वबळावर लढणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Vanchit Bahujan Aghadi Karjat Nagar Panchayat will fight on its own

नगरपंचायतीची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी जाहीर केला.

वंचित बहुजन आघाडी कर्जत नगरपंचायत स्वबळावर लढणार 

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : नगरपंचायतीची आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी जाहीर केला. 

वंचित बहुजन आघाडीची विशेष बैठक प्रल्हाद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष पनाजी कदम, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक नंदकुमार गाडी, चंद्रकांत नेटके, भारतीय सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते प्रा. विक्रम कांबळे, माजी पोलिस निरीक्षक मिलिंद मयूर, नितीन थोरात, अनिल समुद्र, तुकाराम पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

सोमनाथ भैलुमे म्हणाले, ""नगरपंचायत कोण्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. सत्ताधारी पक्षाने चांगला कारभार केला नाही. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, हेच जनतेला पाच वर्षे समजले नाही. जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्षांनी कधी आवाज उठवला नाही. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे चित्र सातत्याने दिसत होते.'' 

"नागरिकांना त्यांच्यासाठी काम करणारे नगरसेवक हवे आहेत. त्यामुळे समाजहितासाठी कार्य करणारे सतरा नगरसेवक जनतेने कल्पकतेने निवडून द्यावेत, यासाठी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. या वेळी आमदार- खासदार विरुद्ध वंचित सामान्य जनता, असा लढा राहणार आहे,'' असे ते म्हणाले. मयूर ओहोळ यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image