राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची पदभार घेताना भीष्मप्रतिज्ञा

Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University Prashant Kumar Patil took charge
Vice Chancellor of Mahatma Phule Agricultural University Prashant Kumar Patil took charge

राहुरी विद्यापीठ : केंद्रीय अर्थकारणामध्ये या विद्यापीठाने विकसीत केलेल्या विविध पिकांच्या जाती, शिफारशी यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या उत्पनात ९४००० कोटी इतके वाढलेले असूनदेखील या विद्यापीठापुढे मनुष्यबळाचे आव्हान आहे, ही बाब शासनाच्या पॉलिसीमेकरच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर स्किल डेव्हलपमेंट होणे गरजेचे आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील स्वीकारला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, केंद्रीय कर संचनालयाचे अधिकारी नीलकंठ आव्हाड, डॉ. हरी मोरे, कुलसचिव मोहन वाघ, नियंत्रक विजय कोते, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. दिलीप पवार, डॉ. सातप्पा खरबडे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. अशोक फरांदे म्हणाले, संख्याबळ कमी असूनही विद्यापीठास शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये अनेक आव्हाने अद्याप बाकी आहेत. आपण सर्व मिळून या कार्यास पुढे नेवू.  डॉ. शरद गडाख म्हणाले, देशभरातील सर्व विद्यापीठाचे मानांकन सुधारणे गरजेचे असून कमी मनुष्यबळामुळे विद्यापीठाच्या संशोधन, विस्तार व शिक्षणामध्ये त्याचा दूरगामी परिणाम होत आहे. 

कुलगुरु पाटील यांचा परिचय डॉ. सुनील गोरंटीवार यांनी करून दिला. प्रास्तविक व स्वागत डॉ. शरद गडाख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी केले.
विद्यापीठाच्या सभागृहात सुरक्षित अंतर ठेवून विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

काजू उत्पन्नावर सर्व काही

राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल या धोरणाचा अवलंब शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, आजही आपल्या देशामध्ये ११००० कोटी रुपयांचा काजू आयात होतो. या मध्ये किती मोठी संधी शेतकऱ्यांना आहे. या धोरणावरच विद्यापीठाची कार्यपध्दती असणार आहे. विद्यापीठ काढणी पश्चात तंत्रज्ञानाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. विद्यापीठाच्या उत्पादनांना एक ब्रँड म्हणून विकसित करण्यात येतील. जास्तीत जास्त कृषी उद्योजक निर्मितीसाठी प्रयत्न करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com