काय सांगता? विखे पाटील तुम्हाला काँग्रेसमध्ये दिसतील...या नेत्याची मन की बात

Vikhe Patil will join the Congress
Vikhe Patil will join the Congress

श्रीगोंदा ः राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात नगरच्या विखे पाटील कुटुंबाची छाप आहे. गेल्या तीन पिढ्यांपासून या घराण्याचा राजकारण, समाजकारणासह विविध क्षेत्रात नावलौकिक आहे.

विखे पाटील कोणत्याही पक्षात असेल तरी त्यांचे स्थान नेहमीच वरचे राहिले आहे. मूळ काँग्रेस विचारांचे असलेले हे घराणे. परंतु काँग्रेसमध्ये असताना स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी आपला स्पष्टवक्तेपणा सोडला नाही. शीर्षस्थ नेत्यांविरोधात त्यांनी बंड पुकारले होते. याचा त्यांना राजकीय तोटाही झाला. परंतु त्यांनी आपल्या विचारांशी कधी तडजोड केली नाही.

नंतर बदलत्या राजकारणात हे घराणे शिवसेनेत गेले. मात्र, तेथेही ते रमले नाहीत. घरवापसीनंतर पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आता बाळासाहेब हयात नाहीत. या घराण्यातील वारसा डॉ. सुजय विखे पाटील चालवित आहेत. ते नगर लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार झाले. त्यामुळे नंतर त्यांचे वडील डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनाही भाजपात जावे लागले.

या घराण्याचा भाजप प्रवेश अनेकांना रूचला नाही. त्यांचे कार्यकर्ते भाजपविचारांशी अजूनही एकरूप झालेले नाहीत. त्यातून त्यांच्या घरवापसीची चर्चा होत असते. ते भाजपात गेले असले तरी काँग्रेसमध्ये आजही त्यांना मानणारा गट आहे. तो गट सातत्याने मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटावर कुरघोडी करीत असतो.

श्रीगोंद्यात सध्या हे सुरू आहे. हेमंत ओगले हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी ई सकाळसोबत बोलताना मन की बात सांगून खळबळ उडवून दिली आहे.

विखेंची लवकरच घरवापसी होईल

""आम्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहोत. विखे पाटील यांचा मूळ स्वभाव हा कॉंग्रेस विचारधारेचा आहे. ते आजही त्याच विचाराचे आहेत. ते पक्षात असताना, पहिल्या फळीचे राज्याचे नेते होते. त्यांना भाजपात जाण्यास विरोध करणारे आपणच होतो. ते तिकडे गेले असले तरी भाजपमध्ये मन रमत नसल्याचे आमच्या लक्षात येते आहे. त्यामुळे भविष्यात ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये दिसले, तर नवल वाटायला नको.'' 

- हेमंत ओगले, काँग्रेस नेता, विखे पाटील समर्थक

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com