esakal | बिहार निवडणुकीसाठी नगरचे विनायक देशमुख निरीक्षक
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Deshmukh is an observer for Bihar elections

कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सर्व पदाधिकाऱ्यांना 20 रोजी पाटणा येथील बिहार प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात पोहचण्याबाबत कळविले आहे. 

बिहार निवडणुकीसाठी नगरचे विनायक देशमुख निरीक्षक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा बिहार निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख रणदीप सुरजेवाला व निमंत्रक मोहनप्रकाश यांनी काल फोनवर कळविल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

बिहारमधील 38 जिल्ह्यांसाठी देशभरातून विविध राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातून देशमुख यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार, माजी खासदार नामदेव उसेंडी, राजाराम पानगव्हाणे, सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कॉंग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सर्व पदाधिकाऱ्यांना 20 रोजी पाटणा येथील बिहार प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात पोहचण्याबाबत कळविले आहे. 

नियुक्तीबाबत देशमुख म्हणाले, की ""प्रदेश सरचिटणीस नात्याने राज्यातील बहुसंख्या जिल्ह्यात मी काम केले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीयस्तरावर काम करण्याची संधी प्रथमच मिळाली. त्याबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह सर्व नेत्यांचे आभार मानतो.'' 
संपादन - अशोक निंबाळकर

loading image