वृद्धेश्वर कारखान्याने उपपदार्थांची निर्मिती करावी ः कर्डिले

वृद्धेश्वर कारखान्याने उपपदार्थांची निर्मिती करावी ः कर्डिले

पाथर्डी ः ""जिल्हा सहकारी बॅंकेने कारखान्याला जेवढे पैसे कर्जाऊ दिले, त्यापेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना कर्ज म्हणून दिले आहेत. वृद्धेश्वर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी बजावली आहे.

कारखान्याने उपपदार्थ निर्मिती करावी. शेतकरी, ऊसउत्पादक व आमदार मोनिका राजळे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. जिल्हा सहकारी बॅंकेत राजकारणविरहित निर्णय घेतले जातात,'' असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. 

श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, आमदार मोनिका राजळे, राहुल राजळे, कारखान्याचे उपाध्यक्ष रामकिसन काकडे, उद्धव वाघ, रावसाहेब वर्पे, माणिक खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, सुभाष ताठे, सोमनाथ खेडकर, नंदकुमार शेळके, अभय आव्हाड, बापूसाहेब पाटेकर, ताराचंद लोंढे, मंगल कोकाटे, अशोक चोरमले, दिनेश लव्हाट आदी उपस्थित होते. 

कर्डिले म्हणाले, ""वृद्धेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालविला आहे. कोरोना संकटामुळे साखरेला उठाव नाही. त्यामुळे उपपदार्थांची निर्मिती करावी. तोट्यातला राहुरी कारखाना आम्ही विखेंच्या नेतृत्वाखाली चांगला चालविला. शेतकरी, कारखान्याचे कामगार व संचालक मंडळावर विश्वास ठेवून जिल्हा बॅंकेकडून कर्जवाटप केले जाते. या वर्षी चांगले गाळप होऊन हंगाम यशस्वी होईल.'' 

जे. आर. पवार यांनी प्रास्ताविक, राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. राहुल राजळे यांनी आभार मानले. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com