esakal | श्रीरामपुरात "जनविकास'चा तिरडी आंदोलनाचा इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

Warning of Jan Vikas Aghadi agitation in Shrirampur

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरपालिकेने तातडीने तपासणी केंद्रासह तात्पुरते कोविड रुग्णालय सुरू करावे. नागरिकांना उपचार देण्यात टाळाटाळ केल्यास पालिकेविरोधात प्रतीकात्मक तिरडी आंदोलनाचा इशारा येथील जनविकास आघाडीचे केतन खोरे, बाळासाहेब गोराणे, विशाल यादव, अक्षय वर्पे यांनी दिला आहे.

श्रीरामपुरात "जनविकास'चा तिरडी आंदोलनाचा इशारा 

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने नगरपालिकेने तातडीने तपासणी केंद्रासह तात्पुरते कोविड रुग्णालय सुरू करावे. नागरिकांना उपचार देण्यात टाळाटाळ केल्यास पालिकेविरोधात प्रतीकात्मक तिरडी आंदोलनाचा इशारा येथील जनविकास आघाडीचे केतन खोरे, बाळासाहेब गोराणे, विशाल यादव, अक्षय वर्पे यांनी दिला आहे. 

नगरपालिकेने तपासणी केंद्रासह तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड रुग्णालय सुरू करावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. नगर महापालिका, संगमनेर व देवळाली प्रवरा नगरपालिकांसह शिर्डी नगरपंचायतीने नागरिकांसाठी उपचार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याच धर्तीवर येथील नगरपालिकेने सुविधा पुरविण्याची मागणी खोरे यांनी केली आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात लॉकडाउनसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला; परंतु संसर्गाची साखळी तुटण्याऐवजी रुग्णसंख्या वाढल्याची टीका केतन खोरे, बाळासाहेब गोराणे यांनी केली. त्यामुळे पालिकेने प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगल कार्यालय, अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृह, मेन रोडवरील आगाशे हॉलसह शहरातील विविध शाळांत कोरोना तपासणी केंद्रे, तसेच गरजूंसाठी मोफत कोविड रुग्णालय सुरू करावे, अन्यथा पालिकेची प्रतीकात्मक तिरडी अधिकाऱ्यांना भेट देण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खोरे यांनी दिला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top