मुख्यमंत्र्यांनी 'शनि'च्या घटनेला न्याय दिला

विनायक दरंदले 
Sunday, 24 January 2021

जेष्ठ नेते गडाख यांच्या हस्ते नुतन संचालक, विश्वस्त  व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

सोनई (अहमदनगर) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अगोदरच्या सरकारचा मनसुबा धुडकावून शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळ निवडीकरीता पुर्वीचीच घटना कायम ठेवत ऐतिहासिक निर्णय दिला. या न्यायामुळे गावाचा त्याग आणि परंपरा जपली गेली, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
 
सोनईत मुळा कारखाना बिनविरोध संचालक, शनैश्वर देवस्थान विश्वस्त व तालुक्यातील नुतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख होते. यावेळी जबाजी फाटके, अॅड देसाई देशमुख, दत्तात्रय लोहकरे, भगवान गंगावणे, कृष्णा तांदळे, कडूभाऊ कर्डिले उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मला नाही तर कुणालाच नाही, असे समजून शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सरकारच्या घशात घालण्याचा डाव खेळणा-याचाच डाव सर्वांनी हाणून पाडला, असे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता टोला लगावत गडाख यांनी मंत्रीपदाचा उपयोग लोकहितासाठीच करेल असा शब्द देत पुढील वर्षी 'मुळा' चा ७५ कोटी रुपये खर्चाचा इथोनॅल प्रकल्प सुरु होईल. सुतगिरणी सह नेवासे, कुकाणे व घोडेगाव येथे व्यावसायिक गाळे निर्मिती करणार असल्याचे सांगितले. 

जेष्ठ नेते गडाख यांच्या हस्ते नुतन संचालक, विश्वस्त  व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी तालुक्याला मोठ्या संघर्षातून सन्मान व काम करण्याचं फळ मिळाल्याचे सांगत ४० वर्ष संस्था जपल्या. त्या यापुढेही जपल्या जातील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत भोर यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Conservation Minister Shankarrao Gadakh has stated that the sacrifice and tradition of the village has been preserved