वन्य प्राण्यांसाठी पाणवठ्यांमध्ये पाण्याची सोय

Watering facilities for wildlife
Watering facilities for wildlife

टाकळी ढोकेश्वर  : उन्हाची दाहकता वाढत असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांजवळ येत आहेत. यातून बऱ्याचदा त्यांचा मानवाशी संघर्ष होतो. कधी कधी रस्ते ओलांडताना अपघात होतात, म्हणून धन्वंतरी मेडिकल ऍण्ड एज्युकेशनल फाउंडेशन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सईद काझी यांच्या संकल्पनेतून आश्रमशाळा परिवाराने ढवळपुरी, भाळवणीसह परिसरात मुक्‍या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. 

ढवळपुरी फाट्यानजीक भोंडवे वस्तीजवळील वन विभागअंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये, तसेच हिवरे कोरडा वन विभागाच्या जंगलामध्ये हरिण, काळवीट, मोर, ससे आदी अनेक प्रकारचे जंगली प्राणी व पक्षी वास्तव्यास आहेत. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ अनेक वेळा हे वन्यजीव मानवी वस्तीत वावर करताना दिसून येत आहेत.

रखरखत्या उन्हात पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांची भटकंती होते. अनेक वेळा त्यांना आपला प्राण गमवावा लागतो. वन विभागाने या मुक्‍या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत. परंतु पाण्याचा अभाव असल्याने डॉ. काझी यांनी आश्रमशाळा परिवाराकडून पाणवठ्यावर पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे.

महाराष्ट्र दिनापासून आश्रमशाळेच्या टॅंकरने पाणी सोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या वेळी वन विभागाचे वनरक्षक नीलेश बढे, गजानन वाघमारे, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बापूसाहेब रूपनर, राजाराम वाघ, लतीफ राजे उपस्थित होते. 
पावसाळा सुरू होईपर्यंत दररोज या वन्यजीव प्राण्यांसाठी दोन लाख लिटर पाणीपुरवठा आश्रमशाळा परिवाराकडून करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
......... 

वन विभागाने या मुक्‍या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठे तयार केले आहेत. परंतु पाण्याचा अभाव असल्याने डॉ. काझी यांनी आश्रमशाळा परिवाराकडून पाणवठ्यावर पाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वन्य जीवांचे होणारे हाल थांबतील. 
- बापूसाहेब रूपनर, आश्रमशाळा मुख्याध्यापक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com