राशीनची बाजारपेठ बंद ठेवायचे काय कारण...राजेभोसले गटाकडून विचारणा

What is the reason for keeping the market closed?
What is the reason for keeping the market closed?

राशीन : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राशीनची बाजारपेठ दुपारी दोन वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येत असल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत अाहे. अनेक व्यावसायिकांची आर्थिक घुसमट होत असल्याने शासकीय नियमाप्रमाणे सायंकाळी पाच वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवावी अशी मागणी राजेभोसले गटातर्फे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

या वेळी राजेभोसले गटाचे नेते विक्रम राजेभोसले, माजी सरपंच संदेश घोसे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, राम कानगुडे, रहीम मुंढे उपस्थित होते.

तहसीलदार आगळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राशीन बाजारपेठ चालू- बंद केली जात आहे. त्यात मर्यादित वेळेमुळे भाड्याने गाळे असणाऱ्या व्यावसायिकांचे भाडेही निघत नाही शिवाय या नियमामुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत अाहे. गर्दी वाढत आहे

संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा तहसीलदार यांनी राशीन बाजारपेठ शासकीय नियमाप्रमाणे सुरू ठेवण्याचा लेखी परवाना व्यावसायिकांना द्यावा.
या मागणीस तहसीलदार आगळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला अाहे. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्याचे विक्रम राजेभोसले यांनी सांगितले.
 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com