crime
crimesakal

तरुणाच्‍या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा

गुन्ह्यात आणखी काही आरोपी सहभागी असल्याचा संशय

जामखेड - पती विशाल सुर्वे अडसर ठरत असल्यानेच कृष्णा सुर्वे आणि त्याचा साथीदार श्रीधरच्या मदतीने पत्नी पूजाने कट रचून नियोजनबध्द खून केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. तशा आशयाची फिर्याद ही मयताचा भाऊ सुशेन सुर्वे याने पोलिसात दिली होती. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काही आरोपी सहभागी असल्याचा संशय मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. त्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

खर्डा (ता. जामखेड) येथील विशाल ईश्वर सुर्वे (वय -३२ वर्षे) राहणार सुर्वे वस्ती याच्या खुनाच्या गुन्ह्यातील अरोपींमध्ये पत्नीचा सहभाग आहे. पत्नी पूजा हिने आरोपी कृष्णा संजय सुर्वे (वय - १९ वर्ष) व त्याचा साथीदार श्रीधर राम कन्हेरकर याच्या मदतीने कट रचून खून केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या तिघांचीही रवानगी जामखेड पोलिस स्टेशनच्या पोलिस कोठडीत केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा दावा मयताच्या नातेवाईकांना पोलिसांकडे केला. त्यांनाही अटक करण्याची मागणी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com