esakal | रस्त्याचे काम सुरु, धोकादायक वळणे तशीच; अकोले तालुक्यात १५ दुचाकीस्वरांचा अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

Work on Kolhar Ghoti State Highway in Akole taluka started

अकोले तालुक्यातून जाणारा राज्यमार्ग ४४ कोल्हार- घोटीचे काम सुरु आहे.

रस्त्याचे काम सुरु, धोकादायक वळणे तशीच; अकोले तालुक्यात १५ दुचाकीस्वरांचा अपघात

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यातून जाणारा राज्यमार्ग ४४ कोल्हार- घोटीचे काम सुरु आहे. या रस्त्यांवरील वळणे काढण्यात न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून हजारो झाडे तोडण्यात आली. मात्र त्याबदल्यात त्यांचे योग्य पद्धतीने रोपण न झाल्याने भविष्यात भरून न येणारे नुकसान होणार आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रश्न सोडविली नाही तर नाविलाजास्त्व जनआंदोलन करून रस्त्याची कामे बंद करावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य पेसा सरपंच परिषदच्या वतीने सरपंच गणपत देशमुख, पांडुरंग खाडे, भरत घाणे, तुकाराम खाडे, भास्कर एलमामे, संतोष सोडनर, अक्षय देशमुख यांनी राजूर येथील अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी,  कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, उपअभियंता आर. एस. शिंदे यांना दिला आहे. 

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर रस्ता काम हे कोरोनामुळे पाऊस असताना सुरु झाले. मात्र या रसत्यावरील छोटी- मोठी वळणे न काढल्याने रस्त्यवर अपघाताचे प्रमाण अधिक होत आहे. पाउस असल्याने झालेली कामे पुन्हा खराब झाली आहेत. 

काही ठिकाणी रास्त्याला खड्डे पडले आहेत. तसेच या रस्त्यावरील ब्रिटीशकालीन पुलांचे काम न करता त्यावर डांबर टाकण्यात आले आहे. 

जिथे नवीन मोरया झाल्या आहेत त्याठिकाणी संरक्षणदृष्टीकोनातून कठडे बांधण्यात यावेत जेणेकरून वाहन अपघात प्रमाण कमी होईल. तर ज्या ठिकाणी काम सुरु आहे त्याठिकाणी धोक्याचे सूचनाफलक असणे आवश्यक असताना ते लावण्यात आले नाही. खोदलेल्या रस्त्याच्याकडेला वाळूच्या गोण्या भरून ठेवण्यात आल्या असून त्यावर रात्रीच्यावेळी चमकेल असे कोणतेही आवरण न टाकल्याने १५ मोटरसायकल चालक जखमी होऊन सध्या दवाखान्यत आहेत. 

या रास्तावरील हजारो झाडे साग, पिंपळ, वड, चिंच कापले मात्र त्याजागी तसाच प्रकारचे झाडे न लावता केवळ झाडांच्या एकाच प्रकारचे झाडे लावले. त्याला कोणतेही संरक्षण नाही. त्यामुळे त्याच्यासोबत लावलेले काठ्या लोकांनी काढून नेल्या आहेत. 

या कामावर नियंत्रण नसल्याने काम निकृष्ट व धीम्या गतीने सुरु आहे. यात तातडीने बदल न केल्यास काम बंद करावे लागेल, असा इशारा दिला निवेदनाद्‌वारे दिला आहे.
नगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे. डी. कुलकर्णी म्हणाले, निवेदन प्राप्त झाले याबाबत योग्य पद्धतीने रस्ता कामे व इतर कामे केली जातील जमीन अधिग्रहण बाबत वारीष्टांशी बोलून वळणे कसे काढता येतील  याविषयी लवकरच निर्णय घेऊ.

संपादन : अशोक मुरुमकर