जिल्हा रुग्णालय जळीतकांड : चौकशी समितीचे काम अंतिम टप्प्यात | Ahmednagar Hospital Fire | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळीतकांड प्रकरण

जिल्हा रुग्णालय जळीतकांड : चौकशी समितीचे काम अंतिम टप्प्यात

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणी विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्‍त चौकशी समितीची मंगळवारी (ता. १६) नाशिकला चार तास बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. या समितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आगीत ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या जळीतकांडच्या चौकशीसाठी आयुक्‍त गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्‍तींचा समावेश आहे. आयुक्‍तांनी अहमदनगरला येऊन घटनास्थळास भेट दिली होती. त्यानंतर समितीमधील सदस्यांना विविध सूचना दिल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने नाशिकला काल बैठक झाली. आयुक्‍तांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी तीन अशी चार तास बैठक सुरू होती. प्रत्येक मुद्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीतील सर्व सदस्यांच्या अहवालानंतर आयुक्‍त अंतिम अहवाल राज्य शासनाना सादर करणार आहेत.

हेही वाचा: 'मिया भाई' फेम रॅपरने सोडली म्युझिक इंडस्ट्री, म्हणाला इस्लाममध्ये..

शुक्रावारी पुन्हा बैठक

एक आठवड्यात या समितीला अहवाल देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. समितीचे अहवाल सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या शुक्रवारी (ता.१९) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार आहेत. त्यानंतर लवकरत-लवकर अहवाल सादर केला जाणार आहे.

हेही वाचा: नाशिक | मालेगाव हिंसाचारप्रकरणी नव्याने आठ जणांना अटक

loading image
go to top