अहमदनगर महाविद्यालयात जागतिक मानवाधिकार दिन साजरा

World Human Rights Day is celebrated at Ahmednagar College 2.jpg
World Human Rights Day is celebrated at Ahmednagar College 2.jpg

अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयात गांधी अध्ययन केंद्र, राज्यशास्त्र विभाग व उन्नत भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस व गांधी अध्ययन केंद्राचे संचालक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

मानवी हक्क दिनानिमित्त ऊन्नत भरात अभियानाचे समन्वयक प्रा. विलास नाबदे यांनी 'मानवी हक्कांची ओळख, अंमलबजावणी यंत्रणा, अडथळे व आव्हाने' या विषयावर ऑनलाईन पोर्टलवर सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी मानवी हक्काच्या उत्क्रांतीपासून ते आधुनिक काळातील मानवी घडामोडीचा ऐतिहासिक आढावा घेतला. मानवी हक्क म्हणजे नैसर्गिक हक्क जे माणसाला जन्मजात प्राप्त होतात. मानवी हक्काच्या अंमलबजावणीसाठी संयुक्त राष्ट्राने विविध उपाय योजना व अंमलबजावणी यंत्रणा निर्माण केल्या आहेत. ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार व त्याच्या हक्कांची अंमलबजावणी यावर नियंत्रण ठेवले जाते.

मानवी हक्कांची जतन व प्रसार करणे ही काळाची गरज आहे, त्यासाठी स्वहक्क विकासाबरोबर दुसऱ्याच्या हक्काचा बाधा आणू नये. 10 डिसेंबर 1948 मानवी हक्कांची जागतिक जाहिरनाम्याला आज 70 वर्ष पूर्ण झाली, तरीही जागतिक समूहापुढील समस्या उग्र स्वरूप धारण करीत आहे. त्यातून हिंसा, हक्कांचे हनन यासारखे प्रकार सतत वाढत आहे. कोविड 19 च्या काळात माणुसकी जपली पाहिजे. त्याशिवाय सामूहिक समस्या थोपवू शकत नाही. भारतीय मानवी हक्काच्या सुरक्षितेतेबाबतीत विचार केल्यास असे स्पष्ट होते. एक पातळीवर मानवी हक्क सुरक्षा यंत्रणा वाढत आहे. मात्र, मानवी हक्क हननाच्या समस्या उग्र होत आहे. वाढती बेकारी, दारिद्र्य शिक्षणाचे खाजगीकरण इ.मुळे भविष्यात भारतीय मानवी हक्क समस्या अधिक उग्र होतील .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. फिरोज शेख यांनी केले तर आभार डॉ. सुधीर वाडेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. डॉ. माया उंडे, प्रा. ज्योती भापकर, राज्यशास्त्र विभागातील प्रा. पूनम घोडके, भास्कर कसोटे व विद्यार्थी उपस्थित होते.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com