खेळ मांडीला सह्याद्रीच्या कुशीत; आदिवासी तरुणही खेळत आहेत क्रिकेट

शांताराम काळे
Tuesday, 15 December 2020

क्रिकेटची क्रेझ सर्वदूर पसरली असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेत राहणारे आदिवासी तरुणही आता क्रिकेट खेळाकडे ओढले जाऊ लागले आहेत.

अकोले (अहमदनगर) : क्रिकेटची क्रेझ सर्वदूर पसरली असून सह्याद्रीच्या डोंगर रांगेत राहणारे आदिवासी तरुणही आता क्रिकेट खेळाकडे ओढले जाऊ लागले आहेत. अलंग, कूलांग, मलंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या पांजरे, उड दवणे, आंबेवाडी परिसरात जंगलातून तोडून आणलेल्या सागाच्या झाडांची बॅट व स्टंप (काठ्या) लावून मोकळ्या मैदानावर हे तरुण क्रिकेट खेळत आहेत.

तानाजी केकरे, सुभाष केंकरे, जनार्दन केंकरे, मिथुन ढवळे, सुरेश पोटकुळे, किसन पोटकुले, सुरेश पाटेकर, संतोष केंकरे हे आदिवासी तरुण क्रिकेटचां सराव करत आहेत. सकाळी ७ वाजेपासून डोंगर माथ्यावर सपाट केलेल्या मैदानावर त्यांचा डाव रंगत आहे.

आदिवासींच्या विकासासाठी शिक्षणसाठी, खेळासाठी आदिवासी विकास कोट्यवधी रुपये खर्च करून आम्हाला साधे क्रिकेटचे साहित्य देत नाही. त्यासाठी आम्ही आदिवासी विभागाकडे चकरा मारल्या पण स्कीम बंद झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मग आम्ही वर्गणी काढून खेळाचे साहित्य आणंनार आहोत. या भागातील दहा गावची मिळून १९ डिसेंबरला मोठी स्पर्धा ठेवणार आहोत. निसर्गाच्या संनिध्यात व अलंग, कुळंग, मलंग गडाच्या पायथ्याशी त्यांनी खेळ मांडीयला व त्यात ते रममाण झाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youngsters from tribal areas also play cricket