जिल्हा परिषद लिपीकवर्गीयांचे प्रश्न सोडवणार - तांबे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

यावेळी संघटनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर, अशोक कदम, कैलास डावरे, रामदास मिसाळ आदी उपस्थित होते. 
 

नगर : जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्‍न दीर्घ काळापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत.

या सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी ग्रामविकास मंत्री व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन पाठपुरावा करू, असे आश्‍वासन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिले. 

जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते संगमनेर येथे करण्यात आले. या वेळी लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी संघटनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर, अशोक कदम, कैलास डावरे, रामदास मिसाळ आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad will solve the problems of clerks - Tambe