यंदाही शाळा घरूनच, गुणवत्तेसाठी गुरूजींची शाळा

स्कूल
स्कूलfile

अहमदनगर ः कोरोनामुळे अद्यापही शाळा सुरू करण्याचे नियोजन झाले नाही. या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करण्यात यावे, असा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने गुणवत्ता विकासाचा ध्यास घेऊन शैक्षणिक कृती आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

कोरोनामुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नसल्या तरी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शाळांमध्ये शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आलेली असली तरी त्यांना वर्कफॉर्म होम करावे लागणार आहे. (Zilla Parishad's school is also online this year)

स्कूल
नागरदेवळे, केकतीत होणार नगरपालिका; मंत्री तनपुरेंची माहिती

ऑनलाइन अध्यापनात जिल्हा परिषदेच्या ३५४५ शाळांनी आपला गुणवत्तेचा टक्का टिकवून ठेवलेला असला, तरी त्यात वाढ व्हावी, यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने आता शैक्षणिक गुणवत्ता विकास कृतिआराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यावर आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी कामकाज करावे, अशा सूचना प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी ऑनलाइन बैठकीत जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अपेक्षा, शाळाभेटीत लक्ष केंद्रित करावयाच्या बाबी, ऑनलाइन व ऑफलाइन अध्यापन, गृहभेटी, मूल्यमापन, शासनाच्या गुणवत्ताविषयक उपक्रमांची अंमलबजावणी, विविध योजनांचे लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणे, कामकाजाचा आढावा आदी मुद्यांवर गटशिक्षणाधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषयतज्ज्ञांना कामकाज करण्याचे सूचित केलेले आहे. त्यानुसारच आता सर्वांना कामकाज करावे लागणार आहे.

अध्यापनाबाबत सूचना

अध्यापनाचे दैनंदिन वेळापत्रक, प्रत्येक वर्गशिक्षकाने पालक बैठका घेणे, एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेणे, ऑनलाइन व ऑफलाइन लाभार्थी विद्यार्थी नियोजन करणे, प्रत्येक वर्गाचा व्हॉट्सॲप ग्रुप करणे आदी.

अधिकाऱ्यांनी भेटीत हे तपासावे

मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती, शाळास्वच्छता, पाणी, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी आदी.

गृहभेटीसंदर्भात सूचना

पंधरा दिवसांतून प्रत्येक विद्यार्थ्यास भेट आवश्‍यक. गृहभेटीला जाताना हालचाल नोंदवावी. गृहभेटीचा अभिलेख.

मूल्यमापन

अध्यानासोबत सराव आवश्‍यक. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आवश्‍यक. मूल्यमापनाचे अभिलेख आवश्‍यक.

गुणवत्ताविषयक उपक्रम

गुणवत्तावाढीसाठी ज्ञानगंगा वाहिनीवरील कार्यक्रम माहिती, ऑनलाइन स्वाध्याय उपक्रमात १०० टक्के सहभाग.

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शैक्षणिक कृतिआराखडा हाती घेण्यात आलेला आहे. त्यानुसार कामकाज करून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणार आहे.

- शिवाजी शिंदे, प्रभारी शिक्षणाधिकारी, प्राथमिक (Zilla Parishad's school is also online this year)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com