राणे मोठे नेते,कोणतीही मागणी करू शकतात!, कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा उपरोधिक टोला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारे नारायण राणे हे मोठे नेते आहे. ते कोणतीही मागणी करू शकतात. प्रसंगी ते देशातही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करू शकतात, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे नेते कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी लगावला. अकाेल्यात खरीप हंगामाचा आढावा बैठकीनंतर कृषी मंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अकोला :  राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारे नारायण राणे हे मोठे नेते आहे. ते कोणतीही मागणी करू शकतात. प्रसंगी ते देशातही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करू शकतात, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे नेते कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी लगावला. अकाेल्यात खरीप हंगामाचा आढावा बैठकीनंतर कृषी मंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह काेश्वारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली हाेती. या मागणीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या पृष्ठभूमीवर शिवसेनेचे नेते तथा कृषी मंत्री दादा भुसे यांनी अकाेल्यात भाष्य केले. मी तर लहान कार्यकर्ता असून, नारायण राणे महान नेते आहेत, अशा शब्दात ना. भुसे यांनी टाेला लगवला.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

विराेधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या काळात भाजपला राजकरण करण्यात रस नसून, राष्ट्रपती राजवटीची मागणी भाजपची नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचे भुसे म्हणाले. मात्र राणे हे भारत, अमेरीका किंवा संपूर्ण जगातच राष्ट्रपती राजवट करण्याची मागणी करू शकतात, असाही टाेला ना. भुसे यांनी लागावला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Narayan Rane is a great leader, he can make any demand !, sarcastic remarks of Agriculture Minister Dadaji Bhuse