तुम्ही कोरोनाला लाईटली घ्याल तर आकडा तर फुगणारच, होम क्वाॅरंटाईन आणि कंटेनमेंट झोनमधील नागरिक बाहेर फिरतातच कसे?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 May 2020

कोल्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता पाचशे्च्यावर गेला आहे. एप्रिल महिन्यांत 14 ते 15 रुग्णसंख्या असणारा हा जिल्हा एकाच महिन्यांच पाचशेच्यावर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, टाळेबंदी असून, सैरवैर रस्त्यावर फिरणे, प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडणे आणि होम क्वाॅरंटाईन म्हणजे शिक्षा समजणे या आणि इतर कारणांनी अकोल्यात फोफावत असल्याचा अंदाड व्यक्त केल्या जात आहे.

अकोला : अकोल्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता पाचशे्च्यावर गेला आहे. एप्रिल महिन्यांत 14 ते 15 रुग्णसंख्या असणारा हा जिल्हा एकाच महिन्यांच पाचशेच्यावर गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, टाळेबंदी असून, सैरवैर रस्त्यावर फिरणे, प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर पडणे आणि होम क्वाॅरंटाईन म्हणजे शिक्षा समजणे या आणि इतर कारणांनी अकोल्यात फोफावत असल्याचा अंदाड व्यक्त केल्या जात आहे.

पुढे हीच मानसिकता राहल्यास अकोल्यातील बाधितांची आकडेवारी अनेकांना अचंबित करून सोडणार ऐवढे मात्र खरे.
अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचशेच्यावर गेली आहे. यामध्ये अजून भर पडणार आहे. रुग्ण बरे होत आहेत खरे. मात्र, दिवसाला उद्रेकासारखे रुग्ण आढळत असल्याने अकोल्यात टाळेबंदी फसली की काय असाही सवाल यानिमित्ताने पुढे येत आहे. तर पुढेही अशीच मानसिकता राहल्यास पाचशे नव्हे तर पाच हजार ऐवढी रुग्णसंख्या होण्यालाही वेळ लागणार नाही असेही बोलले जात आहे.

ही कारणे ठरली रुग्णसंख्या वाढीला कारणीभूत
संस्थात्मक अलगीकरण आता काहीसे सैल झाले आहे. सोबतच होम क्वाॅरंटाईन असणारे कोरोनाला लाईटली घेत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर सकाळी-सायंकाळी होणारी गर्दी आणि दुचाकीवर डबल नव्हे तर ट्रिपल सीट जाणारे नागरिक यासोबतच लाॅकडाउन शिथील झाला असल्यानेही कोरोना चांगल्याच जोमाने फोफावत आहे.

प्रतिबंधित क्षेत्र उरले नावापुरते
अकोल्यात बहुतांश क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहेत. या परिसरातील नागरिक बाहेर येऊन नये यासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत. मात्र, या क्षेत्रातील नागरिक बाहेर पडतात कसे आणि बाहेरील नागरिक आत जातात तरी कसे असा प्रश्न सध्या उपस्थित केल्या जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you take Corona lightly, the numbers will swell, from Akola, How do citizens in the home quarantine and containment zones get out?

Tags
टॉपिकस
Topic Tags: