राज्यात विद्यापीठातील ५० टक्के विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

राज्यातील 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी तसेच अमरावती विद्यापीठातील 35234 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आहे.

अकोला : राज्यातील 11 अकृषी विद्यापीठात यावर्षी एटीकेटी असलेले 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी तसेच अमरावती विद्यापीठातील 35234 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी आहे. अमरावती विद्यापीठातील 49.83 टक्के विद्यार्थी यांचे भवितव्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.

महाराष्ट्रातील 11 विद्यापीठांमध्ये यावर्षी अंतिम वर्षासाठी 8 लाख 74 हजार 890 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी एटीकेटी घेऊन अंतिम वर्षाला आहेत. अमरावती विद्यापीठातील 73 हजार एटीकेटीचे विद्यार्थी, पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठ 25 हजार 124 विद्यार्थी, गोंडवाना विद्यापीठात 16 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, या आदिवासी क्षेत्रामध्ये 66.66 टक्के एटीकेटीचे विद्यार्थी आहेत.

 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

 

नागपूर विद्यापीठात 21 हजार, शिवाजी महाराज विद्यापीठ कोल्हापूर येथे 30 हजार 823 विद्यार्थी, सोलापूर येथील अहिल्याबाई होळकर विद्यापीठात 19 हजार विद्यार्थी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 9 हजार 161, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात 15 हजार, जळगाव येथील बहिणाबाई चौधरी विद्यापीठात 17 हजार 819 तर एस.एन.बी.टी 4 हजार 500 विद्यार्थी एटीकेटी घेऊन अंतिम वर्षाची परीक्षा देण्याची तयारी करीत आहेत. विद्यार्थ्यांचे भवितव्य महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर लागले आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांना नापास करणार का?
एटीकेटी घेवून अंतिम वर्षाची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वच विद्यापीठ मिळून सुमारे 50 ते 60 टक्के विद्यार्थी आहेत. त्या विद्यर्थ्यांना ठाकरे सरकार नापास करणार काय, असा सवाल भाजपचे अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी विचारला आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान ठाकरे सरकारने करू नये यासाठी भाजप नेते व माजी शिक्षण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी उच्च नायालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या लढ्यात अकोला जिल्हा भाजपही सहभागी होऊन विद्यार्थ्यंना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर येण्याची तयारी असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The future of 50 per cent university students in the state is uncertain akola education news