अहो आश्‍चर्यम! लोकमान्य टिळकांच्या आधीपासूनच या गावात साजरा होतो सार्वजनिक गणेशोत्सव

राम चौधरी
Wednesday, 10 June 2020

महाराष्ट्राला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. तो राज्याचा सामाजिक एकात्मतेचा मोठा सण झाला आहे. इतिहास तज्ञांच्या मतानुसार सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केल्याची नोंद आहे. मात्र, मालेगाव तालुक्यातील मैराळडोह या गावाने मध्ययुगीन काळापासून गणेश उत्सवाची परंपरा जपली आहे.

वाशीम ः महाराष्ट्रामध्ये राष्ट्रबांधणीची भावना प्रबळ होऊन एकोपा निर्माण व्हावा यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याची इतिहासात नोंद आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात गणेशोत्सवाची मोठी क्रेझ आहे.  मात्र, अकोला जिल्ह्यालगत असलेल्या वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मैराळडोह या आदिवासीबहुल गावात 400 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.

महत्त्वाचे म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या युगात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरणप्रेमी प्रयत्नशील असताना तब्बल 400 वर्षांपूर्वी कच्च्या मातीपासून बनविलेली गणेश मूर्ती आजही नित्यपुजेत साबूद आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

मध्ययुगीन काळापासून जपली परंपरा 
महाराष्ट्राला गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. तो राज्याचा सामाजिक एकात्मतेचा मोठा सण झाला आहे. इतिहास तज्ञांच्या मतानुसार सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केल्याची नोंद आहे. मात्र, मालेगाव तालुक्यातील मैराळडोह या गावाने मध्ययुगीन काळापासून गणेश उत्सवाची परंपरा जपली आहे.

Image may contain: flower

चारशे वर्षांची परंपरा
या छोट्याश्या गावात 1622 मध्ये दौलतराव घुगे हे चित्तोडहून प्रवास करत मैराळडोह या गावी आले. त्यांनी येथे मोठा वाडा बांधला. या वाड्यावर परिसरातील चिकन मातीची एक गणेशमूर्ती बसविली. तेव्हापासून या गावात गणेशोत्सवाची परंपरा कायम आहे.

दरवर्षी उत्सव
दरवर्षी गणेश उत्सवात वाड्यातील मंदिरातून गणेश मूर्ती काढून तिला रंग दिला जातो. व ती उजव्या बाजूच्या गाभार्‍यात मांडली जाते. एकदा स्थापना झाल्यानंतर पुन्हा तिला पुढच्या गणेश उत्सवापर्यंत स्पर्श करीत नाहीत.

Image may contain: 7 people, people on stage and people standing

मातीपासून बनलेली इको फ्रेंडली मूर्ती
श्रावण मास ते गणपती विसर्जनापर्यंत या वाड्यावर गणेश स्तोत्र व पारायण चालते. ही परंपरा गेल्या 400 वर्षांपासून अबाधीत असल्याचे कुंडलीकराव घुगे व सुमीत घुगे या घुगे घराण्याच्या वारसांनी सांगितले. ही मूर्ती दोन फुट उंच असून मातीने बनविलेली आहे.

इतिहासप्रेमींसाठी पर्वणी
मध्ययुगीन कालखंडामध्ये चाललेला हा गणेश उत्सव आजही संपूर्ण गाव मोठ्या उल्हासात साजरे करते. इतिहासाच्या पानांमध्ये या प्राचीन खेड्याचा उल्लेख कदाचित आडवळणाला असल्याने झाला नसेल, मात्र हा ठेवा इतिहासप्रेमींसाठी पर्वणी तर वाशीम जिल्ह्यासाठी भूषण ठरणारा आहे.

मैराळडोह सारख्या छोट्याशा गावात पिढ्यानपिढ्या अखंड जपलेला दिव्य अनमोल संस्कार मातीच्या गणपतीच्या रूपाने गणपती वाड्यावर विराजमान आहे. दौलतराव घुगे यांच्या पाच पिढ्या व विस्तारलेली 35 कुटुंब गेल्या 400 वर्षांपासून हा संस्कार सांभाळत आहेत. इतिहासाने याची नोंद घेण्याची गरज आहे.
-रवी बाविस्कर, इतिहास संशोधक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola washim Public Ganeshotsav is celebrated in this village even before Lokmanya Tilak