...या दगडाच्या राशीखाली दडलाय महाभारतकालीन खजिना

राम चौधरी
Tuesday, 9 June 2020

वाशीम जिल्हा तसा भूवैज्ञानिक दृष्टीने डोंगरावर वसलेला जिल्हा. मात्र, वत्सगुल्म व आताचे वाशीम हे वाकाटक राजाने आपल्या राजधानीचे ठिकाण केले होते. याचा अर्थ वाकाटाकाच्या आधीही हे शहर समृद्ध होते. वाशीम जिल्ह्यामध्ये अनेक अर्वाचीन व ऐतिहासीक स्थळे आहेत. त्यापैकीच मानोरा तालुक्यातील लहानशा कुपटा गावात शिल्पकलेचा अद्भूत खजिनाच दडला आहे.

वाशीम : वर्‍हाड प्रांत किंवा पूर्वीचा बेरार प्रांत समृद्ध प्रांत म्हणून ओळखला जात होता. महाभारात काळापासून वर्‍हाडातील समृद्धी इतिहासात नमूद आहे. मात्र, एखाद्या गावखेड्यात दडगाच्या राशीत अर्वाचीन खजिना दडलाय हे कोणाला खरेही वाटणार नाही. मात्र, वाशीम जिल्ह्यातील कुपटा या लहानशा गावात तोंडात बोट घालायला लावणारा खजिना दडला आहे.

वाशीम जिल्हा तसा भूवैज्ञानिक दृष्टीने डोंगरावर वसलेला जिल्हा. मात्र, वत्सगुल्म व आताचे वाशीम हे वाकाटक राजाने आपल्या राजधानीचे ठिकाण केले होते. याचा अर्थ वाकाटाकाच्या आधीही हे शहर समृद्ध होते. वाशीम जिल्ह्यामध्ये अनेक अर्वाचीन व ऐतिहासीक स्थळे आहेत. त्यापैकीच मानोरा तालुक्यातील लहानशा कुपटा गावात शिल्पकलेचा अद्भूत खजिनाच दडला आहे.

वाशीम जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पुरातत्व विभागाने याची दखल घेतली नसली तरी, कुपट्यातील वैभव महाभारतकालीन असल्याचा कयास येथील गावकरी लावतात. कुपट्याच्या बाहेर यादवकालीन शिवाचे मंदिर आहे. व त्याच्या समोर विस्तीर्ण बारव आहे. बारवेला देवकोष्टके असलेले दुर्मीळ बाब आहे. अशीच देवकोष्टके असलेली बारव वाशीम येथील देवतलावाला आहेत. या बारवेच्या समोर बाहेरून दगडाची रास दिसणारे केशव मंदिर आहे. बाहेरून या मंदिराची पाहणी केली तर, दगडाच्या शिळा एकावर एक ठेवल्याचा भास होतो. मात्र, आत गेल्यानंतर शिल्पकलेचा अद्भूत नमुना आपल्यासमोर येतो.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या मंदिराचे छत अप्रतिम आहे. छतावर दगडाच्या गोलगोल पट्ट्या उतरत्या क्रमाने ठेवण्यात आल्या आहेत. मधोमध एका गोल दगडावर श्रीकृष्ण आणि गोपी यांची सुंदर शिल्प कोरलेले आहेत. या मंदिरातील मुख्य मूर्ती मात्र नवीन मंदिरात स्थापीत करण्यात आली आहे. ही मूर्ती मेहकरच्या बालाजीच्या मूर्तीप्रमाणेच सुबक आहे. विदर्भामध्ये दगडावर एवढी बारीक कलाकूसर करणारे हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा अद्भूत नमुना आहे.

No photo description available.

मानोरा तालुक्यातील कुपटा येथील केशव मंदिर हे अर्वाचीन मंदिर आहे. या गावामध्ये शिवमंदिर व केशव मंदिराच्या परिसरात बारव व योद्धाशिल्प, वीरगळ, नृसिंह लक्ष्मीची शिल्प, गरूडावर विराजमान विष्णू लक्ष्मी, महिशासुर मर्दिनी शिल्प, भैरव शिल्प, कृष्णाची अर्वाचीन मुर्ती हा ऐतिहासीक ठेवा विखुरलेला आहे. अर्कीयॉलॉजीकडे या मंदिराची नोंद नाही. मात्र हा ठेवा अभ्यासला तर या गावाचा इतिहास उजेडात येऊ शकते.
-प्रा. रवी बाविसकर, इतिहास संशोधक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New treasures hidden under this pile of stones kupta washim akola marathi news