...या दिवशी असतात भारतात सर्वात जास्त वाढदिवस, तुमचा वाढदिवस कधी आहे?

सोमवार, 1 जून 2020

आपण कितीही मोठे झालो तरी वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला उत्साही वाटत असतं. मग अशा या विशेष दिवसाचं आपल्या वर्गातही विशेष ‘सेलिब्रेशन’ करायलाच हवं असं वाटतं. पण तुम्हाला माहित आहे का?  आपल्याकडे कोणत्या दिवशी सर्वात जास्त वाढदिवस असतात, नाही ना? चला तर मग पाहू ही रंजक बातमी...

अकोला:  जवळपास सगळ्यांचाच आपला वाढदिवस हा आवडचा दिवस असतो. आपण कितीही मोठे झालो तरी वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला उत्साही वाटत असतं. मग अशा या विशेष दिवसाचं आपल्या वर्गातही विशेष ‘सेलिब्रेशन’ करायलाच हवं असं वाटतं. पण तुम्हाला माहित आहे का?  आपल्याकडे कोणत्या दिवशी सर्वात जास्त वाढदिवस असतात, नाही ना? चला तर मग पाहू ही रंजक बातमी...

आज 1 जून या दिवशी आपल्या भारतात सर्वात जास्त जन्म झालेल्या व्यक्तींचा देश ठरतो. कारण मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी किमान वय ठरलेलं असते. त्यामुळे पालकांनी सांगायचे अंदाजे व गुरुजींनी ठोकताळे ठरवून जन्म तारीख अशी टाकायची की त्याला जून मध्ये तितकी वर्षे पूर्ण होतील. १ जून भारतातील सर्वात मोठा सर्वात ज्यास्त वाढदिवस असणारा दिवस आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आजच्या आधुनिक काळात वाढदिवस म्हणजे मोठा सणच असतो. वाढदिवशी प्रतिष्ठेसाठी लाखो रूपये खर्च करण्याची नवी संस्कृतीच उदयास आली आहे. तरूणाईबरोबरच वृध्दांनाही या संस्कृतीने विळखा घातला आहे.  1 जून हा भारतातील अनेक जणांचा जन्मदिनांक असतो. आज 2020 साली हयात असलेल्या पाचपैकी किमान एका वृद्धाचा 1 जून हा वाढदिवस असतो. राज्यातील अनेक मंत्र्यांचाही वाढदिवस याच दिवशी आहे हे विशेष.

सर्वात मोठा सरकारी वाढदिवसाचा दिवस
1 जून हा सर्वात मोठा सरकारी वाढदिवस ठिकठिकाणी साजरा होत आहे. सन 1980 दशकापर्यंत जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत आजच्या काळाएवढी जागरूकता नव्हती. तेव्हा आपले मूल कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जन्माला आले हे अनेक आई-वडिलांच्या लक्षातही नसायचे. तेव्हा आतासारखी बाळंतपणे रुग्णालयात होत नसे, त्यामुळे जन्मतारीख, वेळ, दिवस यांची नोंदणी ठेवण्याचा प्रश्‍नच यायचा नाही.

गुरुजींनी ठरविला वाढदिवस
ही मुले जेव्हा मोठी झाली,  शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा अनेकांना आपली जन्मतारीखच माहिती नसायची. तेव्हा मुलांना शाळेत घालण्यासाठी गुरूजी मुलाला हात वर करायला लावून गुरूजींच्या कानापर्यंत हात आले तर मुलगा शाळेत येण्याइतका मोठा झाला म्हणजे  पाच वर्षांचा समजला जात. अशा मुलांना शाळेचे गुरुजी 1 जून ही जन्मतारीख देत असे. त्यामुळे शाळेत प्रवेश घेणे आजच्या आधुनिक काळातील शाळेतील प्रवेशाइतके अवघड नसे.

नोकरीमुळे अडचणी
काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख 1 जूनच केली जायची. त्यामुळे भारतातील अनेकांचा वाढदिवस 1 जूनला येतो. तेव्हा आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छाही देऊयात.